'या' कारणामुळे इराण अमेरिकेशी थेट चर्चा करत नाही; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: इराण आणि अमेरिकेत सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. सध्या दोन्ही देशांतमध्ये मागील काही दिवसांपासून इराणच्या आण्विक कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे. हा विषय जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही देशांमध्ये ओमानच्या मध्यस्थीने अप्रत्यक्षपणे ही चर्चा सुरु आहे. ओमान इऱाण आणि अमेरिकेत मध्यस्थ देश म्हणून कार्य करत आहे. या आण्विक चर्चेच नेतृत्व ओमानचे परराष्ट्रमंत्री बद्र अल-बुसैदी या करत आहेत.
अमेरिका आणि इराणमधील अप्रत्यक्ष चर्चेमागे अनेक कारणे आहे.
यामुळे इराण आणि अमेरिकेमध्ये ओमानच्या मध्यस्थीने अप्रत्यक्ष चर्चा हा एक सुरक्षित पर्याय मानला जात आहे.
इराण आणि अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या आण्विक चर्चेमध्ये अनेक महत्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले आहेत. अमेरिका इराणला त्यांचा युरेनियमचा साठी रशियाकडजे सुपूर्द करण्याची मागणी करत आहे. यामागचा उद्देश म्हणजे इराणच्या आण्विक शस्त्रे बनवण्याला रोखणे आहे. मात्र इराणने यावर चिंता व्यक्त केली आहे. यामागचे कारण म्हणजे, 2015 मध्ये ट्रम्प प्रशासनाने आण्विक करारातून अमेरिका बाहेर पडला होता. यामुळे भिविष्यात अमेरिका पुन्हा असे करणार नाही याची हमी इराणला अमेरिकेकडून हवी आहे,
अमेरिकेने इराण समोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत.
इराणनेही अमेरिकेच्या या मागण्या मान्य करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
सध्या 26 एप्रिल रोजी आणकी एक बैठक होणार आहे. यामुळे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, दोन्ही देश एकमेकांच्या अटी मान्य. करुन शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल उचलतात की, पुन्हा एका युद्ध सुरु होते. सध्या दोन्ही देशांतील चर्चा जागतिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.