पुतिन यांच्या 30 तासांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही रशियन हल्ले सुरूच; झेलेन्स्की यांचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कीव: सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धाला 30 तासांच्या संघर्षविरामाची घोषणा केली आहे. रशिया- युक्रेन युद्धात पहिलाच एक सतारात्मक आणि महत्वपूर्ण टप्पा पाहायला मिळत आहे. ईस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पण याच दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, 30 तासांच्या युद्धबंदीनंतरही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत.
झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, रशियाने युक्रेनच्या कुर्स्क आणि बेल्गोरोडच्या सीमावर्ती भागांमध्ये हल्ले सुरुच ठेवले आहेत. खरं तरं पुतिन यांनी शनिवारी (19 एप्रिल) संध्याकाळपासून रविवार (20 एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही तासांनी कीवसह इतर काही भागांमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजू लागले.
A report by the Commander-in-Chief.
We are documenting the actual situation on all directions. The Kursk and Belgorod regions — Easter statements by Putin did not extend to this territory. Hostilities continue, and Russian strikes persist. Russian artillery can still be heard…
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) April 19, 2025
झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, कमांडर इन चीफकजून मिळालेल्या माहितीनुसार, “पुतिन यांनी 30 तासांच्या संघर्षविरामाची केलेली घोषणा प्रत्यक्षात सीमाभागांपर्यंत पोहोचलेली नाही. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच असून तोफखानांचा आवाज येत आहे. ड्रोन हल्लेही करण्यात आले आहेत. काही भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहरे आहे.”
तसेच झेलेन्स्की यांनी हेही स्पष्ट केले की, युद्धाला जबाबदार फक्त रशिया आहे. “युद्ध सुरु होण्याचे खरे कारण आता स्पष्ट झाले आहे. हे युद्ध रशियानेच सुरु केले आहे.
झेलेन्स्की यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटले की, युक्रेनेन अमेरिका समर्थित 30 दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती, परंतु रशियाने हा प्रस्ताव नाकारला. जर रशियाने कोणत्याही अटी न ठेवता युद्धबंदीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास यूक्रेन देखील मान्यता देईल, मात्र, रशियाने हल्ले सुरुच ठेवले तर युक्रेनही संरक्षणात्मक पावले उचलत योग्य ते प्रत्युत्तर देईल.