
Five foreigners including Indians killed in bus crash on New York highway
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये भारतीय, चीन आणि फिलिपिन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळाताच आपत्कालीन सेवा आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी तातडीने लोकांना बसमधून बाहेर काढण्याचे काम सुरु केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये एकूण ५४ प्रवासी होती.
Video: पाणी, हवा जमीन! इराणने दाखवली आपली ताकद; 1 मिनिटांत डागली ‘इतकी’ घातक मिसाईल्स, जग हादरले
न्यूयॉर्कचे पोलिस अधिकारी मेजर आंद्रे रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याने बसवरील नियंत्रण गमावले असे आंद्रे रे यांनी म्हटले.
या घटनेच्या तापासात कोणताही तांत्रिक बिघाड सापडला नाही. तसेच बस ड्रायव्हरने मद्यपानही केले नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कच्या बफेलो शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर पेम्ब्रोक भागात हा अपघात घडला.
शिवाय प्रवाशांना सीटबेल्टचा वापक केला नव्हता. यामुळे बसल उलटताना खिडक्या फुटल्या आणि प्रवासी बाहेर फेकले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना हेलिकॉप्टर आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे आणि कोणीही गंभीर जखमी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
न्यूयॉर्कच्या राज्यापाल कॅथी होचुल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांना राज्य पोलिसा आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. त्यांना मदतकार्य सुरु ठेवण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटर चक शूमर यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बचाव कार्य अद्यापही सुरु आहे. या घटनेमुळे माहामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण