Ranil Wickremesinghe (Photo Credit - X)
कोलंबो: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांना शुक्रवारी (22 ऑगस्ट 2025) कोलंबो येथे गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) अटक केली आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात वैयक्तिक प्रवासासाठी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच आरोपांबाबत जबाब नोंदवण्यासाठी ते आले असताना त्यांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रानिल विक्रमसिंघे शुक्रवारी सकाळी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागासमोर (FCID) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले होते. एफसीआयडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही त्यांना कोलंबो फोर्ट मॅजिस्ट्रेटसमोर हजर करत आहोत. त्यांना सरकारी मालमत्तेच्या वैयक्तिक वापराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.”
Former Sri Lankan President Ranil Wickremesinghe was arrested by the Criminal Investigation Department (CID) on Friday in connection with an ongoing investigation, reports Reuters, quoting local television channel Ada Derana.
(File photo) pic.twitter.com/uwTW8cTyOB
— ANI (@ANI) August 22, 2025
२०२३ मध्ये हवानाहून परतताना विक्रमसिंघे यांनी लंडनला खासगी दौरा केला होता. या दौऱ्यात ते आणि त्यांची पत्नी मैत्री विक्रमसिंघे यांनी वुल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठातील एका कार्यक्रमात भाग घेतला होता. हा दौरा श्रीलंकेच्या सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर मानला जातो. माजी राष्ट्रपतींनी नेहमीच त्यांच्या पत्नीने प्रवासाचा खर्च स्वतः उचलला असल्याचा दावा केला होता आणि कोणताही सरकारी निधी वापरला नसल्याचे म्हटले होते.
मात्र, पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) आरोप केला आहे की विक्रमसिंघे यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रवासासाठी सरकारी निधी वापरला आणि सरकारने त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा खर्चही उचलला. याच प्रकरणात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
विक्रमसिंघे यांनी जुलै २०२२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. देशातील आर्थिक संकट आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला होता. श्रीलंकेची अर्थव्यवस्था स्थिर करण्याचे श्रेय विक्रमसिंघे यांना दिले जाते. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांचा अनुरा कुमारा दिसानायके यांच्याकडून पराभव झाला.