इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे (Former Prime Minister of Pakistan Imran Khan arrested). पाकिस्तानी रेंजर्सच्यावतीनं इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर (Islamabad Highcourt) ही कारवाई करण्यात आली. हायकोर्टात अनेक प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी इम्रान खान कोर्टात पोहचले होते. गेल्या काही दिवसांपासून ते पाकिस्तानी लष्कराच्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात सातत्यानं वक्तव्यं करीत होते.
This is how they’re treating Pakistan’s national leader inside the court premises. Unbelievable and disgusting! #نکلو_خان_کی_زندگی_بچاؤ pic.twitter.com/ZQTDYqonaU
— PTI (@PTIofficial) May 9, 2023
इम्रान खान यांच्या पक्षानं व्हिडीओ केला शेअर, इम्रानचा वकील रक्तबंबाळ
पाकिस्तानीतल वृत्तपत्र ‘द डॉन’ या वृत्तपत्रानं सांगितलं आहे की, इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय यांनी अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. पक्षाचे नेते मुसर्रत चिमा यांनी एक व्हिडीओ मेसेजही प्रसिद्ध केला आहे. इम्रान खान यांना टॉर्चर करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ते इम्रान खान यांना मारत असल्याचं चिमा सांगतायेत. पार्टीच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवर इम्रान खान यांच्या वकिलाचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या बाहेर इम्रान खान यांना मारहाण करण्यात आल्याचं त्यांचच्या पक्षाचं म्हणणं आहे.
अल कादिर ट्रस्टच्या प्रकरणात अटक
इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्टच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. हा विद्यापीठाशी संबंधित मोठं प्रकरण असल्याचं सांगण्यात येतंय. इम्रान खान यांनी पंतप्रधान पदावर असताना या विद्यापीठाला कोट्यवधींची जमीन बेकायदेशीर मार्गानं दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा गौप्यस्फोट पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मलिक रियाज यांनी केला होता.
इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीनं अटकेची भीती दाखवत अब्जावधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करुन घएतली, असा आरोप रियाज यांनी केला आहे. या प्रकरणानंतर रियाज आणि त्यांच्या मलीतील संवादाचा एक ऑडिओही लिक झाला होता. या संभाषणात रियाज यांची मुलगी सांगतेय की, इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी तिच्याकडं सातत्यानं पाच कॅरेटच्या हिऱ्याच्या अंगठीची मागणी करते आहे. यावर रियाज तिला सांगतात की, जर ती सर्व काही ती करत असेल तर पाच क२रेटची अंगठी तिला देऊन टाक