
Asif Khawaja Claims Rising Demand for JF-17 Fighter Jets
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी दावा केला आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पराभूत होऊनही पाकिस्तान नफ्यात आहे. पाकिस्तानला JF-17 च्या लढाऊ विमानांच्या ऑर्डर येते आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी 2025 मे मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत भारताने लष्करी कारवाई केली होती. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणी नष्ट केली होती. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला केला होता. परंतु भारताने पाकिस्तानचा चोख प्रत्युत्तर देत पराभव केला. या संघर्षात पाकिस्तानच्या नूर ए खान एअरबेसचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात देखील आहे.
आसिफ ख्वाजा यांच्या म्हणण्यानुसार, भारतासोबतच्या चार दिवसच्या संघर्षात पाकिस्तानचे नुकसान झाले असले तरी त्यांना लष्करी विमानांच्या ऑर्डर येत आहेत. त्यांचे हे धक्कादायक विधान अशा वेळी आहे, जेव्हा खुद्ध आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेत आहे.
ख्वाजा यांनी बांगलादेशला लढाऊ विमानांच्या संभाव्य विक्रिची चर्चा सुरु असल्याचे सांगितेल. JF-17 हे चीन आणि पाकिस्तानचा संयुक्त प्रकल्प आहे. हे कमी किमतीचे असून गेल्या अनेक दशकापासून पाकिस्तानच्या हवाई दलाता तैनात आहे. पाशात्य देशांकडून शस्त्रे खरेदी करता न येणाऱ्या देशांना किंवा निर्बंध असलेल्या देशांनी पाकिस्तान हे विमान देते.
याशिवाय ख्वाजा यांनी असाही दावा केला आहे की, लढाऊ विमानांची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली आहे. यांची मागणी वाढत असून आता लवकरच पाकिस्तानवा IMF कडून कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. पंरुत IMF च्या बाबत त्यांचा हा दावा पोकळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण लढाऊ विमानांचा करार हा अधिक गुंतागुंतीचा असतो. अनेक वर्षांपासून पैसे द्यावे लागतात. यामुळे पाकिस्तानला IMF वरील अवलंबित्व संपवणे जवळजवळ अशक्यत आहे.
‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sinddor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO