Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France News : उल्कापिंडांपासून बनवतो महागडे चाकू; एका चाकूची किंमत तब्बल ६.९ लाख रुपये; कारागिराची अनोखी कला चर्चेत

France News : फ्रान्समधील युरे प्रांतातील एक कारागीर उल्कापिंडांमधील धातूंचा वापर करून वैशिष्ट्यपूर्ण चाकू तयार करतो. त्याच्या एका चाकूची किंमत ५.३ ते ६.९ लाख रुपयांपर्यंत आहे. विज्ञान, अवकाश आणि पारंपरिक कारागिरीचा संगम असलेली ही अनोखी कला चर्चेत आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 28, 2026 | 09:02 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अवकाशातून आलेल्या धातूपासून चाकू बनवण्याची अनोखी कल्पना
  • एका चाकूची किंमत ६.९ लाख रुपये
  • कारागिरी आणि विज्ञानाचा अनोखा संगम
France News : कोणाच्या डोक्यात कधी काय कल्पना येईल याची कल्पनाच आपण करू शकणार नाही . आकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कापिंडाचा वापर करून चाकू तयार करता येऊ शकतो ही कल्पना सत्यात, फ्रान्समधील जोरीस डोमारेस्ट कलाकाराने आपल्या कलेतून उतरवली आहे .

तो चक्क उल्कापिंडीपासून महागडे आणि आकर्षक चाकू तयार करतो . त्याच्या हाताने तयार केलेल्या एका चाकूची किंमत तब्बल ५ हजार ते ६ हजार युरो म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ५.३ ते ६.९ लाख रुपये आहे . या अनोख्या कलेमुळे हा जोरीस डोमारेस्ट सध्या चर्चेत आला आहे .त्याच्या चाकूच्या कलाकुसरीची भुरळ फ्रान्समधील लोकांवर पडत आहे .

अवकाशातून आलेल्या धातूपासून चाकू बनवण्याची अनोखी कल्पना

फ्रान्समधील युरे ( Eure ) प्रांतात हा कारागीर  जोरीस डोमारेस्ट आपल्या वेगळ्या कलेमुळे चर्चेत आला आहे . पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कापिंडामुळे आढळणाऱ्या धातूंचा वापर करून तो चाकू तयार करतो . उल्कापिंडामध्ये प्रामुख्याने लोखंड आणि निकेलसारखे धातू आढळतात . या धातूंना योग्य पद्धतीने आकार देऊन त्याहून आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण चाकू तयार केले जातात . प्रत्येक उल्कापिंडाची रचना वेगळी असल्याने त्यापासून तयार होणाऱ्या वास्तुंनाही एक वेगळे स्वरूप मिळते .

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले

एका चाकूची किंमत ६.९ लाख रुपये

जोरीस डोमारेस्ट ने तयार केलेल्या चाकूंची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे . एका चाकूची किंमत ५ ते ६ हजार युरो म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ५.३ ते ६.९ लाख रुपये आहे . एवढी मोठी किंमत असतानाही अशा वस्तुंना विशेष संग्राहक आणि दुर्मिळ वस्तूंची आवड असलेल्या ग्राहकांकडून मागणी मिळते . या चाकूंचे वैशिष्ठ केवळ त्यांचा वापर नसून त्यामागे असलेला अवकाशाचा इतिहास आणि कारागिरांचे कौशल्य आहे .

त्यामुळे या वस्तू शौकीन तसेच कलाकाराची किंमत किंवा कलाकाराच्या कलेचा आदर म्हणून अशा वस्तू खरेदी केल्या जातात . त्याचबरोबर बदलणाऱ्या माणसाच्या विचारांमुळे अशा महागड्या आणि दुर्मिळ वस्तूचे मालक असणे हे श्रीमंत असल्याचे सामाजिक प्रतीक म्हणून सुद्धा खरेदी केले जाते .

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी

कारागिरी आणि विज्ञानाचा अनोखा संगम

उल्कापिंडापासून वस्तू तयार करणे हे सामान्य लोहारकामापेक्षा अधिक आव्हानात्मक मानले जाते . धातूची रचना , त्याचे तापमान आणि घडणावळीची प्रक्रिया यांचा विशेष अभ्यास करावा लागतो . योग्य तंत्राचा वापर करूनच त्याला अपेक्षित आकार देता येतो . विशेष म्हणजे उल्कापिंडामधील नैसर्गिक धातूंच्या रचनेमुळे तयार वस्तूंवर वेगळी नक्षी आणि पोत दिसू शकतो . त्यामुळे चाकूला स्वतंत्र ओळख मिळते . विज्ञान , इतिहास आणि पारंपरिक कामगिरी यांचा संगम असलेली ही कला फ्रान्समध्ये लक्ष वेधून घेत आहे .

Web Title: France meteorite knife artisan joris demarest cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • art
  • France
  • Marathi News

संबंधित बातम्या

Saudi Arabia News : सौदीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा; कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवर
1

Saudi Arabia News : सौदीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा; कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवर

Maharashtra News : महाआयडी, महासारथी, महाडीबीटीचा विस्तार; सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणार – मुख्यमंत्री फडणवीस
2

Maharashtra News : महाआयडी, महासारथी, महाडीबीटीचा विस्तार; सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणार – मुख्यमंत्री फडणवीस

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले
3

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
4

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.