
फोटो सौजन्य सोशल मीडिया
या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर महागाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते. मात्र, या विशिष्ट हल्ल्याची सौदी प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.
हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर असलेला हा प्रकल्प सौदी अरेबियाच्या ऊर्जा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे ५ लाख ५० हजार बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते.
त्यामुळे या ठिकाणच्या सुरक्षेला विशेष महत्त्व आहे. हल्ल्याच्या दाव्यानंतर तेल प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऊर्जा पुरवठा विस्कळीत करण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले
हल्ल्याच्या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ११५ डॉलरच्या पुढे गेल्याने तेल बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यपूर्वेतून जगातील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो.
त्यामुळे या भागातील कोणत्याही लष्करी संघर्षाचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर होतो. पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाल्यास व्यापारी आणि गुंतवणूकदार तेल खरेदीकडे अधिक कल दाखवतात. परिणामी दरांमध्ये अचानक वाढ होऊ शकते.
Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्यास देशाच्या आयात खर्चात वाढ होते. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि वाहतूक खर्चावर होण्याची शक्यता असते. वाहतूक महागल्यास अन्नधान्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही दबाव निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी वाढल्यास जागतिक तेलपुरवठ्याचे गणित बिघडू शकते. त्यामुळे सौदी अरेबियातील परिस्थिती आणि तेल बाजारातील हालचालींकडे जगाचे लक्ष लागले आहे.