Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News : महाआयडी, महासारथी, महाडीबीटीचा विस्तार; सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणार – मुख्यमंत्री फडणवीस

Maharashtra News : महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटी या डिजिटल व्यासपीठांच्या माध्यमातून शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा आणि प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता वाढावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 28, 2026 | 07:31 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावी होणार
  • महाइंडस’मुळे प्रशासकीय कामकाज सुलभ
  • डिजिटल प्रणालींचा प्रत्यक्ष वापर महत्त्वाचा
  • महाडीबीटी, आपले सरकार आणि मैत्री पोर्टलवर नवीन सेवा
Maharashtra News : कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणीही या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महासारथी पोर्टलचा आढावा घेण्यात आला. यावेळी ‘महाडीबीटी २.०’, ‘आपले सरकार २.०’, ‘मैत्री’ पोर्टलवरील नवीन सेवा आणि ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला.

या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

शासकीय कामकाजासाठी एकात्मिक डेटाबेस, एआयचा वापर आणि विविध विभागांतील माहितीचे एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘महाआयडी’च्या माध्यमातून नागरिकांची माहिती एकत्रित करण्याबरोबरच शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढविण्यास मदत होणार आहे.

शासन निर्णयांच्या मोठ्या संग्रहातून आवश्यक माहिती वेगाने शोधणे, पत्रव्यवहाराचे व्यवस्थापन करणे आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ करणे यासाठी या प्रणालींचा उपयोग होईल. सार्वभौम एआयचा अशा प्रकारे वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

BMC Employees Diwali Bonus : दिवाळीपूर्वी बंपर गिफ्ट! BMC कर्मचाऱ्यांना तब्बल 33000 रुपयांच्या बोनसची घोषणा; कधी जमा होणार पैसे?

योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावी होणार

‘महासारथी’ हा राज्याचा महत्वाकांक्षी उपक्रम पूर्णत्वाकडे जात असून, त्यातील विविध विभागांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रणालीमध्ये विविध विभागांच्या माहितीचे एपीआय इंटिग्रेशन केल्यास संबंधित डेटाचे सातत्याने अद्ययावतीकरण करणे शक्य होईल. त्यातून योजनांची अंमलबजावणी, निधीचा विनियोग आणि लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

विशेषतः वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये योग्य लाभार्थ्यांची निवड, अपात्र लाभार्थ्यांची ओळख आणि योजनांमुळे प्रत्यक्षात साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी एकत्रित माहितीचा उपयोग होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाइंडस’मुळे प्रशासकीय कामकाज सुलभ

‘सर्वम एआय’च्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यात मराठीसह २२ भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे. शासकीय डेटा देशाबाहेर जाणार नाही किंवा एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्लॅटफॉर्मवरील ‘जीआर एक्सपर्ट’ सुविधेद्वारे आजपर्यंतचे शासन निर्णय शोधणे आणि त्यांतील बदल तपासणे, ‘ई-मेल समरायझर’द्वारे ई-मेलचा सारांश तयार करणे, तर ‘आरएफपी बिड इव्हॅल्युएटर’च्या माध्यमातून निविदांची तुलना व मूल्यांकन करणे शक्य होणार आहे.

Jalna Drought : दुष्काळात महिला मजुरांना काम मिळेना; मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून वसुली सुरूच

डिजिटल प्रणालींचा प्रत्यक्ष वापर महत्त्वाचा

‘महाडीबीटी’, ‘आपले सरकार २.०’ आणि ‘मैत्री २.०’ या उपक्रमांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केवळ डिजिटल व्यवस्था उभारणे पुरेसे नाही, तर संबंधित विभागांनी त्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू करणे आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना या प्रणालींशी जोडणे महत्वाचे आहे. प्रणालींचा वापर वाढल्यास त्यातील त्रुटी आणि अडचणी लक्षात येतील व त्यावर वेळेत उपाययोजना करता येतील.

महा आयडी’चे सॉफ्ट लॉन्च करण्यात आले असून, त्याअंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून अधिक आयडी तयार झाले आहेत. सर्व विभागांचे बॅकएंड इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर ही प्रणाली अधिक व्यापक स्वरूपात कार्यान्वित करता येईल. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी निर्धारित वेळेत पूर्ण करून पुढील टप्प्याचे नियोजन काटेकोरपणे राबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

महाडीबीटी, आपले सरकार आणि मैत्री पोर्टलवर नवीन सेवा

‘महाडीबीटी २.०’वर मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४, कामगार विभागाच्या १० आणि महिला व बालविकास विभागाच्या दोन अशा एकूण ३६ नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ‘आपले सरकार २.०’ पोर्टलवर परिवहन विभागाच्या ६१ सेवांसह विविध विभागांच्या एकूण ७१ सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच ‘मैत्री’ पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या १३ नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra mahaydi mahasarathi mahadbt government transparency cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • Maharashtra Goverment
  • Maharshtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Saudi Arabia News : सौदीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा; कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवर
1

Saudi Arabia News : सौदीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा; कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवर

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले
2

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
3

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी

‘Sewa First Innovation Challenge 2026’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्र झोनमधून ६५ हजारांहून अधिक नोंदणी!
4

‘Sewa First Innovation Challenge 2026’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्र झोनमधून ६५ हजारांहून अधिक नोंदणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.