Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरोपीय निवडणुक प्रक्रियेत एलॉन मस्कचा हस्तक्षेप; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क सध्या जगभरातील राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील मतांमुळे चर्चेचा विषय बनत आहेत. काही देशांमध्ये त्यांनी उजव्या विचारसरणीच्यापक्षांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर तीव्र टिका केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2025 | 02:23 PM
युरोपीय निवडणुक प्रक्रियेत एलॉन मस्कचा हस्तक्षेप; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

युरोपीय निवडणुक प्रक्रियेत एलॉन मस्कचा हस्तक्षेप; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

बर्लिन: टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क सध्या जगभरातील राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील मतांमुळे चर्चेचा विषय बनत आहेत. काही देशांमध्ये त्यांनी उजव्या विचारसरणीच्यापक्षांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर तीव्र टिका केली जात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतेच मस्क यांच्यावर निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “दहा वर्षांपूर्वी कोणी विचार केला असता का की जगातील मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक अनेक देशांतील निवडणुकांवर प्रभाव टाकेल?” नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांनीही यावर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “युरोपीय देशांच्या लोकशाही प्रक्रियेत अशा हस्तक्षेपांमुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यास धोका निर्माण होऊ शकतो.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘मी शपथ घेण्यापूर्वी…’; ओलिसांच्या सुटकेबाबत पुन्हा एकदा ट्रम्प यांचा हमासला इशारा

जर्मनीतील निवडणुकीत देखील मस्कचा हस्तक्षेप

जर्मनीमध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार आहेत. मस्क यांनी जर्मनीतील विरोधी पक्ष अल्टरनेटिव फर ड्यूशलँड (AFD) ला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर AFD पक्षाचे चान्सलर उमेदवार एलिस वीडेल यांच्यासोबत लाइव्ह कार्यक्रम करण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी असेही म्हटले की, “जर्मनीला फक्त AFDच वाचवू शकते.” यामुळे जर्मनीतील सत्ताधारी पक्षाने मस्क यांच्या हस्तक्षेपाचा तीव्र विरोध केला आहे. जर्मनीच्या चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी मस्क यांना “ट्रोल” संबोधले आणि त्यांचा पाठिंबा नाकारला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे मस्कचा दर्जा वाढला

मस्क यांचा राजकीय प्रभाव अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला होता. ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या कर्तृत्वाचे महत्त्व वाढले आहे. ट्रम्प सरकारमध्ये मस्क डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) सांभाळणार आहेत. या विभागाचा उद्देश सरकारी खर्चात एक तृतीयांश कपात करणे आहे.

मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी दावा केला आहे की, “भले ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले असतील, पण खरी सत्ता मस्क यांच्या हातात आहे.” जगभरातील निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या मस्क यांच्या कृतींवर जगभरातील नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकांमध्ये अशा हस्तक्षेपांमुळे लोकशाही प्रक्रियेला हानी पोहोचू शकते, असा इशारा युरोपमधील अनेक नेत्यांनी दिला आहे.

अमेरिकेतील H-1B व्हिसा वाद

अमेरिकेत H-1B व्हिसावरुन पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद उभारला आहे. सीनेटर बर्नी सॅंडर्स यांनी H-1B व्हिसा प्रोग्रामवर टीका करत म्हटले की, “याचा हेतू सर्वोत्तम कौशल्य असलेल्या लोकांना आणणे नाही, तर कमी पगारावर परदेशी कामगार नेमणे आहे.” त्यांनी एलॉन मस्क यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांच्या कंपन्या, जसे की टेस्ला आणि स्पेसएक्स, स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून परदेशी कामगारांना कमी पगारात नियुक्त करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तिबेट भूकंपात मृतांचा आकडा वाढला; 126 जणांचा बळी तर 188 जण जखमी

Web Title: French president macron accuses elon musk of poll interference in europe elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • France
  • World news

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
2

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
3

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
4

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.