'मी शपथ घेण्यापूर्वी...'; ओलिसांच्या सुटकेबाबत पुन्हा एकदा ट्रम्प यांचा हमासला इशारा(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला ओलिसांच्या सुटकेबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. त्यांनी हमासला अल्टिमेट देत म्हटले आहे की, 202 जानेवारीपूर्वी ओलिसांची सुटका न झाल्यास मध्येपूर्वेत विध्वंस होईल. त्यांनी इस्त्रायलमधून बंदी करण्यात आलेल्यांनी सोडण्याचा आदेश दिला आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्त्रायलवर मोठा हल्ला केला होता. त्यावेळी इस्त्रायली लोकांना बंधक बनवण्यात आले होते.
तर मध्यपूर्वेत विध्वंस होईल
यापूर्वीही ओलिसांची सुटका करण्यासाठीहमासला डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा सांगितले होते. ट्रम्प यांनी कतारमधीवल ओलिसांच्या सुटकेबाबत इस्त्रायल आणि हमासच्या नेतृत्वात चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. यासंबंधित त्यांनी म्हटले की, “मी कोणत्याही वाटाघाटींना हानी पोहोचवू इच्छित नाही, परंतु मी शपथ घेण्यापूर्वी ओलिसांच्या सुटकेवर करार झाला नाही तर मध्य पूर्वमध्ये विध्वंस होईल. सर्व काही उद्ध्वस्त होईल. मला वेगळं काही सांगायची गरज नाही, पण इतकंच.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तिबेट भूकंपात मृतांचा आकडा वाढला; 126 जणांचा बळी तर 188 जण जखमी
ओलिसांच्या कुटुंबीयांकडून ट्रम्प यांना फोन
ट्रम्प यांनी ओलिसांच्या कुटूंबीयांना आश्वासन दिले आहे. तसेच त्यांनी ओलिसांची सुटका आधीच व्हायला हवी होती असेही म्हटले. त्यांनी सांगितले की, त्यांना इस्रायल आणि इतरत्र बंधकांच्या कुटुंबियांकडून कॉल येत आहेत. 7 ऑक्टोर 2023 च्या हल्ल्या खरं तरं घडला नसता, पण तो घडला आणि बरेच लोक मरण पावल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी हमासला आवाहन केले आहे कुटूंबीयांच्या प्रियजणांना कैदेतून मुक्त करा. तसेच हमासने काही अमेरिकन लोकांना देखील कैद केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, लोक रडत आहेत त्यांच्या माझ्यावर विश्वास ठेवून विचारत आहेत की, मी त्यांच्या मुलांचे मृतदेह परत आणू शकतो का?
शपथ घेण्यापूर्वी चांगली बातमी मिळावी अशी आशा
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्हन चार्ल्स विटकॉफ मध्यपूर्वेच्या दौऱ्याहून परते आहेत. त्यांनी या दौऱ्यादरम्यान ओलिसांच्या सुटकेला उशीर कशामुळे झाला याबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, नकारात्मक असे काही नाही. तसेच त्यांनी या संबंधित खूप चांगली प्रगती केली आहे. त्यांनी म्हटले की, मला आशा आहे की ट्रम्प शपथ घेण्यापूर्वी चांगली बातमी मिळेल.
हमास 34 ओलिसांच्या सुटकेसाठी तयार
सध्या हमास आणि इस्त्रालमध्ये ओलिसांच्या सुटकेबाबत चर्चा सुरु असून हमासने34 ओलिसांच्या सुटकेस मान्ता दिली आहे. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध आणि आजारी कैद्यांचा समावेश आहे. मग ते जिवंत असो वा मृत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने गाझा सीमेवरील अनेक इस्त्रायलच्या लष्करीभागांवर हल्ले केले आणि जवळपास 254 लोकांना ओलीस ठेवले. आतापर्यंत हमासने 150 हून अधिक ओलिसांची सुटका केली असून, अजूनही 100 लोक हमासच्या कैदेत आहेत. इस्रायली लष्कराने 34 जणांच्या हत्येला दुजोरा दिला आहे.