जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शनिवारी (२२ नोव्हेंबर) पंतप्रधान मोदींनी G-20 परिषदेदरम्यान कॅनडाचे (Canada) पंतप्रधान मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनेवर ACITI भागीदारीची घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत तीन खंड आणि तीन महासागरांमध्ये लोकशाही सहकार्य मजबूत करण्याचा उद्देश आहे.
या उपक्रमाअंतर्गत तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्रीकरण, AI च्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर, तसेच हरित उर्जा विकासाला गती देण्यावर आणि पुरवठा साखळीत विविधता आणण्यावर भर दिला जाणार आहे. या भागीदारीमुळे भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रात सुरक्षितता, विश्वासार्हता वाढले असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. नव्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी हे त्रिकुट एकत्र आले आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी स्टारमर यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाल्याचे म्हटले. भारत आणि ब्रिटनमधील वाढत्या भागीदारीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. तसेच शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञा आणि हवामान बदल यांसारख्या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढवण्यावर भर दिला. तसेच पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी देखील हवामान बदल, जागतिक शांतता आणि जागाच्या शाश्वत विकासावर चर्चा केली.
A new trilateral technology and innovation partnership! Had an excellent meeting with Mr. Anthony Albanese, PM of Australia and Mr. Mark Carney, PM of Canada on the sidelines of the G20 Summit in Johannesburg. We are delighted to announce an Australia-Canada-India Technology and… pic.twitter.com/Qa5lSvlIb2 — Narendra Modi (@narendramodi) November 22, 2025
दरम्यान पंतप्रधान मोदींनी G-20 च्या दुसऱ्या सत्रात परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर दक्षिण आफ्रिका खंडाच्या विकासाला प्राधान्य दिले. तसेच त्यांनी ड्रग्ज आणि दहशतनादाविरोधी एकतेचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?
Ans: भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाने ACITI भागीदारीची मोठी घोषणा केली आहे.
Ans: या ACITI उपक्रमाअंतर्गत भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलियात तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्रीकरण, AI च्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर, तसेच हरित उर्जा विकासाला गती देण्यावर आणि पुरवठा साखळीत विविधता आणण्यावर भर दिला जाणार आहे.






