
फोटो सौजन्य AI
हाकान फिदान यांनी नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायली सरकारच्या गाझा विषयक धोरणांवर जोरदार आक्षेप नोंदवला . गाझामध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर मानवी संकट निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे . त्यांच्या मते , या परिस्थितीकडे केवळ प्रादेशिक संघर्ष म्हणून पाहता येणार नाही .
नागरिकांचे संरक्षण , मानवतावादी मदत आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर या मुद्यांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे . फिदान यांनी नेतान्याहू यांच्या धोरणांमुळे केवळ पॅलेस्टानी नागरिकांवर परिणाम होत नसून संपूर्ण मध्यपूर्वेतील स्थैर्य धोक्यात येत असल्याचे म्हंटले आहे . इस्रायलच्या लष्करी कारवायांमुळे प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे .
Iraq Blast : बगदादजवळ अल-डोरा पॉवर प्लांटमध्ये अज्ञात स्फोट; भीषण आग, आगीवर नियंत्रण
तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केवळ निषेध व्यक्त करण्यापेक्षा ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे . नेतान्याहू सरकारच्या धोरणांवर दबाव आणण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर प्रभावी पावले उचलली पाहिजेत , अशी भूमिका फिदान यांनी मांडली .
गाझामधील नागरिकांना मानवतावादी मदत मिळणे आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटावर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . तुर्कीने यापूर्वीही गाझामधील इस्रायली लष्करी कारवाईवर कठोर टीका केली आहे . तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान आणि परराष्ट्र मंत्री फिदान यांनी पॅलेस्टानी नागरिकांच्या संरक्षणाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सातत्याने उपस्थित केला आहे . त्यामुळे फिदान यांचे ताजे वक्तव्य हे तुर्कीच्या पूर्वीच्या भूमिकेचीच पुढील भूमिका मानली जात आहे .
Gaza War : गाझातील युद्धात २६७ पत्रकारांचा मृत्यू; ८० टक्क्यांहून अधिक मीडिया सुविधा उद्ध्वस्त
गाझा युद्धामुळे तुर्की आणि इस्रायलमधील संबंध आधीपासूनच तणावपूर्ण आहेत . पॅलेस्टानी प्रश्नावर दोन्ही देशांच्या भूमिकेमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे . अशा परिस्थितीत फिदान यांनी नेतान्याहू वर केलेली टीका राजनैतिक पातळीवरही महत्वाची मानली जात आहे .
दरम्यान , गाझामध्ये युद्धविराम , मानवतावादी मदत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न सुरु आहेत . मात्र युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांमध्ये अद्याप अनेक अडथळे आहेत . तुर्कीने या प्रक्रियेत अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत . फिदान यांच्या वक्त्यव्यामुळे नेतान्याहू सरकारवरील आंतरराष्ट्रीय दबावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे .