
फोटो सौजन्य AI
India-Russia Oil : ऑगस्टमध्ये भारताची रशियन तेल आयात 26% घटली; चीनच्या वाढत्या खरेदीचा मोठा परिणाम
ऑक्टोबर २०२५ मध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतर गाझामधील मोठ्या प्रमाणावरील युद्ध काही प्रमाणात कमी झाले . मात्र इस्रायली लष्करांकडून हमासच्या कारवाया लक्ष करत मर्यादित हवाई हल्ले आणि लष्करी कारवाया सुरूच राहिल्या आहेत .
या कारवायांमध्ये नागरिकांचाही मृत्यू होत असल्याचे गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे . ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी जून मध्ये संयुक्त राष्ट्रांसमोर सांगितले होते कि , युद्धविराम औपचारिकरीत्या कायम असला तरी त्याचे वारंवार उल्लंघन होत आहे . आणि युध्दविरामानंतर गाझामध्ये ९०० हुन अधिक पॅलेस्टानी मारले गेले आहेत .
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या २६ ऑगस्टच्या अहवालानुसार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या युध्दविरामानंतर मृतांची संख्या १,३०३ वर पोहोचली होती . याशिवाय ४,३३६ जण जखमी झाले असून , ढिगाऱ्याखालून ८१४ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हंटले आहे .
त्यामुळे सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार मृतांचा आकडा ९०० पेक्षा बराच पुढे गेला आहे . ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरवातीसही गाझामध्ये हल्ल्यांचा घटना घडल्या आहेत . ३१ ऑगस्टला इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान पाच पॅलेस्टानी ठार झाल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले . १ सप्टेंबरलाही विविध कारवायांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे .
युद्धविराम असूनही सुरु असलेला हिंसाचारामुळे गाझातील परिस्थिती अद्याप गंभीर आहे . इस्रायल हमासच्या निशास्त्रीकरणावर आणि सुरक्षा मुद्यांवर ठाम आहे . तर हमासकडून इस्रायलवर युध्दविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे . अमेरिकेच्या मध्यस्थीने गाझासाठी व्यापक शांताता आराखडा पुढे नेण्याचे प्रयत्न सुरु असले तरी जमिनीवरील हिंसाचारामुळे त्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे .