Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza News : पैसा नाही ,मदत कशी करणार? संयुक्त राष्ट्राकडे पैसे नाहीत ;५ लाख पॅलेस्टानी उपाशी मारणार

Gaza News : गाझातील निधीअभावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने ५ लाख पॅलेस्टिनी नागरिकांची मासिक अन्नमदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांची संख्या १६ लाखांवरून ११ लाखांवर येणार असून, गरम जेवण आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यातही कपात करण्यात आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 19, 2026 | 06:07 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • १६ लाखांवरून लाभार्थ्यांची संख्या ११ लाखावर
  • अन्नधान्य आणि जेवणातही कपात
  • सहा महिन्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्सची गरज
Gaza News : एका युद्धामुळे निरपराध लोकांना काय काय भोगावे लागते याची कल्पना करूच तेवढी कमी आहे . इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षानंतर उध्वस्त झालेल्या गाझामधील नागरिकांसमोर आता उपासमारीचे संकट समोर उभे राहिले आहे . आधीच जीव मुठीत घेऊन जगणे , कधीही काहीही होऊ शकते या परिस्थितीत शिक्षण , आरोग्य , यासाख्या संस्था जवळपास मोडकळीस आल्या असताना आता अन्ना अभावी मरण येईल कि काय अशी अवस्था पॅलेस्टानी लोकांची झाली आहे . कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने ( WFP ) निधीच्या तीव्र कमतरतेमुळे सुमारे ५ लाख पॅलेस्टानी नागरिकांची मासिक अन्नमदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .

खासकरून म्हणजे गाझातील दोन तृतीयांश लोकसंख्या अजूनही अन्नटंचाईचा सामना करत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे लाखो नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न पुनः एकदा गंभीर बनला असून , जगभरातील मानवतावादी संघटनांना यावर काय उपाय काढायचा हा देखील प्रश्न उभा राहिला आहे . जर संयुक्त राष्ट्र संघटनेवरच पैशाचा दुष्काळ पडला असेल तर जग किती बदलत आहे याचा अंदाज येऊ शकतो . कारण संयुक्त राष्ट्र संघाला अमेरिकेडून सहकार्य मिळायचे खूपच कमी झाले असून ट्रम्प यांचा मोठा सहभाग यात आहे . असे जागतिक राजकीय विश्लेषक सांगतात .

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?

१६ लाखांवरून लाभार्थ्यांची संख्या ११ लाखावर

संयुक्त राष्ट्राच्या अन्न कार्यक्रमाकडून यापूर्वी गाझातील १६ लाख नागरिकांना दर महिन्याला अन्नधान्य किंवा आर्थिक मदत दिली जात होती . मात्र आर्थिक निधी कमी झाल्यामुळे आता ही संख्या ११ लाखांपर्यंत मर्यादित करण्यात येणार आहे . परिणामी सुमारे ५ लाख नागरिकांना नियमित आता महिन्याच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे . याशिवाय मदत मिळणाऱ्या कुटुंबाना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटांचीही संख्या दोन वरून एक करण्यात आली आहे .

अन्नधान्य आणि जेवणातही कपात

कमी निधी झाल्याचा परिणाम केवळ अन्नधान्याच्या पाकिटांवरच झालेला नाही , तर गरम जेवणाच्या वाटपातही झाला आहे . याअगोदर दररोज २ लाख ५० हजार गरम जेवणाचे रोज वाटप केले जात होते . आता ही संख्या १ लाख ५० हजारांपर्यंत कमी करण्यात आली आहे . दुर्गम भागातील काही कुटुंबाना दररोज मिळणाऱ्या जेवणाऐवजी एक दिवसाआड जेवण दिले जाणार आहे . तसेच ७५ हजार कुटुंबाना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर कात्री लावण्यात आली आहे .

LeT Terrorist Abu Hashim: हाफिज सईदच्या जवळचा साथीदार अबू हाशिमचा लाहोरमध्ये गूढ मृत्यू; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला

सहा महिन्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्सची गरज

गाझामधील परिस्थिती सुधारण्यासाठी जागतिक अन्न कार्क्रमाला पुढच्या सहा महिन्यांसाठी सुमारे ४५० दशलक्ष डॉलर्सच्या निधीची गरज आहे . सध्या गाझातील जवळपास १४ लाख नागरिकांना गंभीर अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे . त्यात जगण्याची गॅरंटीही नाही . हिवाळा जवळ येत असताना निवारा , अन्न आणि मूलभूत सुविधांचा अभाव अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे . निधीची कमतरता अशीच कायम राहिल्यास आतापर्यंत झालेली परिस्थिती सुधारणेची मोहीम ही मागे जाऊ शकते . असा इशारा जागतिक अन्न कार्यक्रमाने दिला आहे .

Web Title: Gaza news no fundshow can aid be provided the united nations is out of money 500000 palestinians face starvationcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • food news
  • Gaza
  • israel-palestine war
  • Marathi News
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर
1

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर

CSU: अंगावर वारंवार पित्त उठतंय? केवळ अॅलर्जी समजण्याची चूक करू नका! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
2

CSU: अंगावर वारंवार पित्त उठतंय? केवळ अॅलर्जी समजण्याची चूक करू नका! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Yezdi News : आता येझदी बाईक खरेदी होणार आणखी सोपी! Amazon आणि Flipkart वर २०२६ ची नवी श्रेणी उपलब्ध
3

Yezdi News : आता येझदी बाईक खरेदी होणार आणखी सोपी! Amazon आणि Flipkart वर २०२६ ची नवी श्रेणी उपलब्ध

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले
4

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.