Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Germany Politics : AfDचा झंझावाती उदय; जर्मनीनंतर आता संपूर्ण युरोपच्या राजकारणाला हादरा

Germany Politics : सॅक्सनी-अॅनहॉल्ट विधानसभा निवडणुकीत AfDने जवळपास 44 टक्के मते मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बहुमतापासून पक्ष काही जागा दूर असला तरी हा निकाल जर्मनीच्या राजकारणातील मोठा बदल मानला जात आहे. AfDच्या वाढत्या प्रभावामुळे युरोपातील इतर अति-उजव्या आणि लोकानुनयवादी पक्षांनाही राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 05:54 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • AFD चा ऐतिहासिक विजय
  • जर्मनीच्या राजकारणात मोठा बदल
  • युरोपमध्ये अति उजव्या लाटेला बळ
Germany Politics : जर्मनीच्या सॅक्सनी अँनहॉल्ट राज्यातील निवडणुकीत अति – उजव्या AFD पक्षाने ऐतेहासिक विजय मिळवत तब्बल ४३ .८ टक्के मते मिळवली आहेत . दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जर्मनीतील एखादा अति – उजवा पक्ष राज्य पातळीवर सत्तेच्या इतका जवळ पोहोचला आहे . या निकालामुळे जर्मनीच्या राजकारणासोबतच संपूर्ण युरोपमध्ये अति – उजव्या राजकीय शक्तींच्या वाढीवर नव्याने चर्चा सुरु झाली आहे .

AFD चा ऐतिहासिक विजय

सॅक्सनी अँनहॉल्ट २०२६ विधानसभा निवडणुकीत AFD जवळपास ४४ टक्के मतांसह सर्वात मोठा पक्ष ठरला . पक्षाला ८३ पैकी ३९ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४२ जागांपासून तो तीन जागा दूर आहे . त्यामुळे AFD ला सरकार स्थापन करण्यासाठी इतर आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे .

मात्र जर्मनीच्या मुख्य प्रवाहातील पक्षांनी आतापर्यंत AFD सोबत सत्तेत जाण्याचे धोरण नाकारले आहे . AFD च्या यशामागे स्थलांतर , आर्थिक अडचणी , सुरक्षा आणि पारंपरिक राजकीय पक्षविरोधात नाराजी हे महत्वाचे मुद्दे असल्याने विश्लेषण केले जात आहे . पक्षाने स्थलांतरवर कठोर भूमिका घेत मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे .

Gaza Tragedy : शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकलीचा मृत्यू; वफा आणि वडील इस्रायली हल्ल्यात ठार

जर्मनीच्या राजकारणात मोठा बदल

AFD चा प्रभाव अचानक निर्माण झालेला नाही . २०२५ च्या जर्मन निवडणुकीतही AFD ने २०.८ टक्के मते मिळवत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले होते . २०२१ च्या तुलनेत पक्षाच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली होती . त्यामुळे सध्याच्या राज्य निवडणूक निकाल हा AFD च्या सातत्याने वाढत असलेल्या राजकीय प्रभावाचा पुढचा टप्पा मानला जात आहे .

या निकालामुळे जर्मनीतील पारंपरिक पक्षांमसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे . खासकरून स्थलांतर , अर्थव्यवस्था आणि सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर मतदारांचा असंतोष कमी करण्यात मुख्य प्रवाहातील पक्ष कितपत यशस्वी होतात . यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहतील .

Gaza : ६२ निष्पाप मुलांसह १०० पॅलेस्टिनींचे मृतदेह दफन; गाझात शोककळा

युरोपमध्ये अति उजव्या लाटेला बळ

जर्मनी हा युरोपियन युनियनमधील सर्वात प्रभावशाली देश असल्याने तेथील राजकीय बदलांचा परिणाम इतर देशांवरही होतो . AFD च्या विजयाचे स्वागत युरोपातील काही अति – उजव्या नेत्यांनी केले असले , तरी फ्रान्स आणि पोलंडसह काही देशांतील नेत्यांनी या निकालाबाबत चिंता व्यक्त केली आहे .

युरोपातील अनेक देशांमध्ये स्थलांतर , महागाई , राष्ट्रीय ओळख आणि सरकार विरोधातील नाराजी यामुळे उजव्या आणि लोकानुनयवादी पक्षांना वाढता पाठिंबा मिळत आहे . त्यामुळे AFD चा सध्याचा विजय हा केवळ जर्मनीतील प्रादेशिक निकाल न राहता युरोपातील बदलता राजकीय प्रवाहाचा महत्वाचा संकेत ठरू शकतो .

 

Web Title: German politics the meteoric rise of the afd after germany european politics as a whole is now shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Election News
  • Election Result
  • Germany

संबंधित बातम्या

Germany: अंतराळ क्षेत्रात युरोपचा नवा अध्याय! जर्मन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम’ रॉकेटचे यशस्वी उड्डाण; 5 उपग्रह अवकाशात स्थापित
1

Germany: अंतराळ क्षेत्रात युरोपचा नवा अध्याय! जर्मन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम’ रॉकेटचे यशस्वी उड्डाण; 5 उपग्रह अवकाशात स्थापित

Germany-Russia Tension : विमानतळावरील ड्रोन हल्ल्यासाठी रशिया जबाबदार; जर्मनीचा थेट आरोप
2

Germany-Russia Tension : विमानतळावरील ड्रोन हल्ल्यासाठी रशिया जबाबदार; जर्मनीचा थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.