Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Robot Misbehavior In Germany: धक्कादायक! तरुणीच्या मागून आला अन् करू लागला आक्षेपार्ह चाळे; रोबो पोलिसांच्या ताब्यात

Robot Misbehavior In Germany:  जर्मनीतील कोलोन शहरात ११ ऑक्टोबरच्या रात्री एका रोबोकडून तरुणीला आक्षेपार्ह स्पर्श झाल्याची घटना घडल्याचे वृत्तात म्हटले आहे. फास्ट फूड दुकानाबाहेर मैत्रिणींसोबत उभ्या असलेल्या तरुणीजवळ सुमारे १२० सेंटीमीटर उंचीचा लाल आणि सोनेरी रंगाचा रोबो आला आणि त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 01:30 PM
Robot Misbehavior In Germany: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Robot Misbehavior In Germany: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ११ ऑक्टोबरच्या रात्री फास्ट फूड दुकानाबाहेर तरुणीला रोबोकडून आक्षेपार्ह स्पर्श
  • रोबो आपोआप नव्हे, तर रिमोटद्वारे चालवला
  • रोबोचा १६ वर्षीय मालक आणि त्याच्या १९ वर्षीय मित्रावर संशय व्यक्त
  • पोलिसांनी रोबो तसेच दोघांचे मोबाईल फोन ताब्यात
Robot Misbehavior In Germany:  गेल्या काही वर्षात रोबोचा वापर खूप वाढला आहे. कंपनीत, हॉटेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये सगळीकडे रोबो काम करताना दिसतात. धोक्याची कामे पण रोबो सहज करतात. पण याच रोबोचा वापर वाईट कामासाठी पण होऊ लागला आहे, याचा धक्कादायक प्रकार जर्मनीत घडला आहे.

जर्मनीतील कोलोन शहरात एका रोबोने एका तरुणीला अश्लील स्पर्श केल्याची घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तो रोबो जप्त केला असून दोन तरुणांवर संशय व्यक्त केला जात आहे.

नेमके काय घडले?

ही घटना 11 ऑक्टोबरच्या रात्री घडली. कोलोनमधील एका फास्ट फूड दुकानाबाहेर एक तरुणी तिच्या दोन मैत्रिणींसोबत उभी होती. तिच्या मैत्रिणी 17 आणि 18 वर्षांच्या आहेत. रात्री 11.45 च्या सुमारास अचानक एक रोबो तिथे आला.

हा रोबो साधारण 120 सेंटीमीटर उंच होता. त्याचा रंग लाल आणि सोनेरी होता. तो हळूहळू त्या तरुणीच्या मागून आला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला. त्या तरुणीला काही कळायच्या आतच हा प्रकार घडला. तिथे असलेल्या लोकांना पण काय चालले आहे हे समजले नाही. तरुणीने लगेच आरडाओरड केली आणि पोलिसांना फोन केला.

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?

दोन तरुणांचा हात असल्याचा संशय

पोलिसांच्या तपासदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली. हा रोबो आपोआप काम करत नव्हता, तर त्याला कोणीतरी रिमोटने चालवत होते. पोलिसांना दोन तरुणांवर संशय आहे. एक 16 वर्षांचा मुलगा आहे जो त्या रोबोचा मालक आहे आणि दुसरा त्याचा 19 वर्षांचा मित्र आहे.

या दोघांनीच रिमोटने रोबोला चालवून हा प्रकार केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर या दोघांनी या सगळ्या घटनेचा व्हिडिओ पण काढला. तो सोशल मीडियावर लाईव्ह दाखवला. त्यातला एक जण व्हिडिओवर बोलत पण होता, असे समोर आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा ते दोघे तिथेच सापडले. त्यांनी तो रोबो एका फोक्सवॅगन गाडीच्या डिक्कीत लपवून ठेवला होता. पोलिसांनी लगेच तो रोबो ताब्यात घेतला. सोबतच दोघांचे मोबाईल फोन पण जप्त केले आहेत.आता पोलिस हे बघत आहेत की रोबो नक्की कसा ऑपरेट केला जात होता. त्याच्या हालचाली रिमोटने कंट्रोल केल्या होत्या का, व्हिडिओ का काढला, लाईव्ह का केला, या सगळ्याचा तपास सुरू आहे.

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

रोबोचा गैरवापर वाढतोय

टेक्नॉलॉजी वाढत आहे तसा त्याचा चांगला वापर होतोच, पण वाईट वापर पण वाढतोय. रोबोचा वापर गुन्ह्यांसाठी होऊ शकतो हे या घटनेने दाखवून दिले आहे. जर्मनीतील ही घटना पहिलीच आहे असे नाही, याआधी पण काही ठिकाणी अशा तक्रारी आल्या होत्या.

आता पोलिस त्या दोन तरुणांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पुढील कारवाई सुरू आहे.या घटनेमुळे एक प्रश्न उभा राहिला आहे की रोबो बनवताना त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी कशी घ्यायची.

Web Title: Germany cologne robot misbehavior police investigation rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Germany
  • Internation news
  • Robot

संबंधित बातम्या

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
1

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.