
फोटो सौजन्य सोशल मीडिया
फेडरल प्रॉसिक्युटरच्या कार्यालयाने त्यांच्यावर हेरगिरी, राज्याची गुप्त माहिती मिळवणे आणि देशद्रोहाचा प्रयत्न केल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. हॅनिंग यांना मंगळवारी दक्षिण जर्मनीत अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत BNDमधील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तपास यंत्रणेनुसार, हॅनिंग यांना BNDमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या माजी सहकाऱ्याकडून अनेक वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर गोपनीय कागदपत्रे मिळाल्याचा संशय आहे. तपासात जवळपास २ हजार कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.
यातील काही माहितीचा वापर हॅनिंग यांनी खासगी सल्लागार म्हणून काम करताना केल्याचा आरोप आहे. एका प्रकरणात गोपनीय माहितीच्या आधारे परदेशी गुप्तचर अधिकाऱ्यासाठी विश्लेषण तयार केल्याचा संशयही तपासकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, संबंधित परदेशी गुप्तचर संस्था कोणती होती, याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.
Israel News : युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
या प्रकरणात हॅनिंग यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ Manfred D.यांनाही अटक करण्यात आली आहे. तपासानुसार, त्यांनी २०१२ पासून २०२२ पर्यंत किंवा त्यानंतरही BNDमधील गोपनीय माहितीपर्यंत प्रवेश मिळवून हॅनिंग यांना कागदपत्रे पुरवल्याचा संशय आहे. त्याबदल्यात आर्थिक मोबदला दिला गेल्याचा आरोप आहे.
हॅनिंग यांच्या अटकेमुळे जर्मनीच्या गुप्तचर व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातून देशाच्या संवेदनशील माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.
Pakistan News : इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
तपासकर्त्यांच्या मते, हॅनिंग यांनी मिळालेल्या संवेदनशील माहितीच्या आधारे एका परदेशी गुप्तचर अधिकाऱ्यासाठी विश्लेषण तयार केले असावे. या प्रकरणात नेमकी कोणती परदेशी गुप्तचर संस्था सहभागी होती, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे तपासाचा हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.