Global firepower index ranking list 2025 know where india ranks
नवी दिल्ली: जागतिक संरक्षण माहितीचा मागोवा ठेवणाऱ्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने 2025 साठी नवीन लिस्ट जाहीर केली असून, यामध्ये जगातील सर्व देशांच्या सैन्यशक्तीच्या आधारे त्यांची रँकिंग ठरवण्यात आली आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सच्या अहवालानुसार, भारताने आपले चौथे स्थान कायम राखले आहे, तर पाकिस्तानची रॅकिंग घसरली असल्याने देशाला मोठा धक्का मिळाला आहे. तर आजही अमेरिकेचे सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली आहे, तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या आधारे ठरवले स्थान
ग्लोबल पॉवर इंडेक्स प्रत्येक देशाची लष्करी तुकड्या,, दैशाकडे असलेली उपकरणे तसेच आर्थिक स्थिरता आणि देशाचा अर्थसंकल्प, भौगोलिक स्थिती आणि उपल्बध स्त्रोत यांसारखे ६० पेक्षा जास्त पॅरामीटर्सच्या आधारे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांचे मूल्यांकन ग्लोबल पॉवर इंडेक्स करते. या आधारे पॉवरइंडेक्स क्रमांक देण्यात येतो आणि कमी पॉवरइंडेक्स असलेला देश सर्वात शक्तिशाली ठरवण्यात येतो.
भारताची जागतिक पावर रँकिंग
या ग्लोबल फायरपावरच्या 2024 च्या अहवालानुसार, 2024 मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर होता आणि 2025 मध्येही त्याने हे स्थान कायम ठेवले आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची भर आणि सामरिक दृष्टिकोन यामुळे त्याची ताकद वाढली आहे. भारताचा पावर इंडेक्स स्कोर 0.1184 आहे.
पाकिस्तानला धक्का
मात्र, या अहवालानुसार, पाकिस्तानच्या रॅंकिगमध्ये घट झाली असून 2024 मध्ये 9व्या स्थानावर असलेला पाकिस्तान आता मात्र, 2025 मध्ये तो 12व्या स्थानावर घसरला आहे. ही रॅंकिंग त्यांच्या संरक्षण क्षेत्रातील मर्यादा आणि आर्थिक अडचणींमुळे निर्माण झाली आहे.
जगातील सर्वात शक्तिशातील सैन्य असलेले पहिले पाच देश
जगातील टॉप-10 सैन्यशक्ती असलेले देश 2025
यादीतील इतर देश
यानंतर, यूके, फ्रान्स, जपान, तुर्की, इटली, यांनी देखील पहिल्या दहा देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. तर भूतान सर्वात शेवटच्या स्थानी आहे. यावरून स्पष्ट होते की, भूतानला सैन्यशक्ती टिकवण्यासाठी आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीची मोठी भूमिका असते.