
Government Shutdown becomes longest in US history
America Shutdown News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या ३६ दिवसांपासून सर्व सरकारी कामकाज ठप्प आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे शटडाऊन आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पहिल्या काळात ३५ दिवसांसाठी शटडाऊन झाले होते. तसेच सामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.
America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम
सध्या शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रसनल बजेट ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, आता पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये निधी वेधयक मंजूर होऊ शकले नाही, यामुळे हे शटडाऊन सुरु आहे. विधेयकावर आतापर्यंत १३ वेळा मतदान झाले आहे, पण प्रत्येक वेळी केवळ ५५ मते मिळाली आहे. विधेयक पास होण्यासाठी ६० मतांची आवश्यकता आहे.
डेमोक्रॅट्स पक्षाने कोव्हिड महामारीच्या काळात दिल्या गेलेल्या हेल्थ केअर सबसिडी वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु ट्रम्प प्रशासनाच्या रिपब्लिकन नेत्यांनी याला नकार दिला आहे. त्यांच्या मते, यामुळे सरकारला जास्त खर्च करावा लागेल ज्याचा इतर क्षेत्रांवर परिणाम होईल असे म्हटले आहे. ‘ट्रम्प डेमोक्रॅट्स पक्षाशी चर्चा करण्यास तयार आहेत, परंतु त्यांनी आरोग्य सेवेतील सबसिडी वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
गेल्या ३६ दिवसांपासून सुरु असलेल्या या शटडाऊनमुळे आतापर्यंत विमान वाहतूकीवर, लष्कर, सीमा सुरक्षा, पोलिस सुरक्षांवर मोठा परिणाम झाला आहे. या शटडाउनमुळे सध्या ७,५०,००० सरकारी कर्चारी पगाराशिवाय सुट्टीवर आहेत. यामुळे लोकांना कर्ज दैनंदिन खर्चासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे दररोज ४०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत आहे. हे शटडाऊन असेच सुरु राहिले तर याचा गंभीर परिणा होण्याची शक्यता आहे.
शटडाऊनमुळे अन्न पुरवठा देखील खंडित झाला आहे. फूड स्टॅम्प मदत निधी कमी पडत असल्याने थांबवण्यात आली आहे. दरवर्षी १ ऑक्टोबरपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होते. याआधी निधी विधेयक मंजूर होणे महत्त्वाचे असते. पण ३६ दिवसानंतरही अमेरिकेचे निधी विधेयक मंजूर झालेले नाही. डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन नेत्यांमध्ये आरोग्य सेवेतील सबसिडी वाढवण्यावरुन वाद सुरुच आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. अमेरिकेत किती दिवसांपासून सुरु आहे शटडाऊन?
गेल्या ३६ दिवसांपासून अमेरिकेचे सर्व सरकारी कामकाज ठप्प आहे.
प्रश्न २. अमेरिकेत का सुरु आहे शटडाऊन?
ट्रम्प प्रशासनाचे निधी विधेयक नामंजूर झाल्याने अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे.
प्रश्न ३. अमेरिकेतील शटडाऊनमुळे किती लोक प्रभावित?
या शटडाऊनमुळे अमेरिकेतील ७,५०,००० सरकारी कर्मचारी प्रभावित झाले आहेत.
America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…