America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या सिनेटमध्ये फंडिग बिलाला मंजूरी न मिळाल्याने हे शटडाऊन सुरु आहे. आतापर्यंत ११ वेळा मतदान करण्यात आले आहे. पण सरकारला ६० पैकी केवळ ५५ मते मिळाली आहेत. यामुळे निधी मंजूर झालेला नाही.
या शटडाउनमागे मुख्य कारण म्हणजे हेल्थ केअर सबसिडीवरील रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स मधील मतभेद आहे. डेमोक्रॅट पक्षाने या हेल्थ केअर सबसिडीत वाढ करण्याची मागणी केली आहे, मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने याला नकार दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मते, सबिसिडी वाढवल्यास सरकारचा खर्च वाढेल आणि याचा इतर विभागांवर विपरित परिणाम होईल. याव कोणताही पक्ष तडजोड करायला तयार नाही. यामुळे अमेरिकेत २२ दिवसानंतरही शटडाउन सुरुच आहे.
परंतु या शटडाउनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अमेरिकेला प्रत्येक आठवड्यात ०.२% जीडीपीचे नुकसान होत आहे. याचा हवाई सेवांवरही परिणामझाला आहे. अनेक उड्डाणे उशिराने होत आहे. तसेच कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांला अन्न-पाणी न मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच स्मिथसोनियन म्युझियम्स बंद झाली आहे. याशिवाय आण्विक शस्त्रास्त्र सरुक्षा एजन्सीचे १४०० हजार कर्मचारी पगाराशिवाय सुट्टीवर आहेत. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
फंडिग बिल पास न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या शटडाउनसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सला जबाबदार धरले आहे. ट्रम्प यांच्या मते डेमोक्रॅट्स मुळे सरकारी कामकाज बंद पडले आहे. तसेच त्यांनी डेमोक्रॅट्स दबावाखाली झुकणार नसल्याचेही म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने सध्या काही सरकारी सेवा गैर-आवश्यक म्हणून बंद केल्या आहे. तसेच संरक्षण आणि स्थलांतरितांशी संबंधित कामकाज सुरुच ठेवले आहे.
तज्ज्ञांच्या मते, छोटा शटडाउन ट्रम्प प्रशासनाच्या राजकीय फायद्यासाठी आहे. मात्र दीर्घकाळ सरकारी कामकाज ठप्प राहिले तर याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. अमेरिकेत किती दिवसांपासून सुरु आहे शटडाऊन?
गेल्या २२ दिवसांपासून अमेरिकेत शटाडऊन सुरु आहे.
प्रश्न २. अमेरिकेत का सुरु आहे शटडाऊन?
ट्रम्प प्रशासनाचे निधी विधेयक मंजुर न झाल्याने अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे.
प्रश्न ३. शटडाऊनसाठी ट्रम्प यांनी कोणाला जबाबदार धरले आहे?
शटडाऊनसाठी ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्स पक्षाला जबाबादरा धरले आहे.
प्रश्न ४. अमेरिकेच्या डेमोक्रॅट पक्षाने रिपब्लिकन पक्षाकडे निधी विधेयकासाठी काय मागणी केली आहे?
रिपब्लिकन पक्षाने सादर केलेल्या निधी विधेयकाला डेमोक्रॅट्सने विरोध केला आहे. त्यांनी विधेयकात कोव्हिड महामारीच्या काळात दिल्या गेलेल्या हेल्थ केअर सबसिडी वाढवण्याची मागणी केली आहे.
प्रश्न ५. रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट्सच्या मागणीवर काय म्हटले आहे?
रिपब्लिकनने डेमोक्रॅट्सची मागणी मान्य करण्यास नकार देत. सबसिडी वाढवल्यास सरकारला जास्त खर्च करावा लागेल ज्यामुळे इतर विभागांवर याचा विपरीत परिणाम होईल, असे म्हटले.
America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…






