ट्रम्प यांना मेलोनी यांचे चोख उत्तर, 'आपल्या सैनिकांनी अफगाणिस्तानात रक्त सांडले', त्यांच्या योगदानाला कमी लेखणे अस्वीकार्य' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Giorgia Meloni response to Donald Trump NATO : जागतिक राजकारणात एकेकाळी एकमेकांचे जवळचे मित्र समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांच्यात आता ‘नाटो’ (NATO) युतीवरून जुंपली आहे. २२ जानेवारी रोजी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात (WEF) डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो सहयोगी देशांबद्दल एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांना ऐतिहासिक पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिले आहे.
दावोसमध्ये एका मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकेला कधीही त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून लष्करी मदतीची गरज नव्हती. अफगाणिस्तान युद्धाचा संदर्भ देताना ते म्हणाले, “नाटो देशांनी काही सैन्य पाठवले होते, पण ते नेहमीच आघाडीच्या ओळींपासून (Frontlines) लांब सुरक्षित ठिकाणी राहिले. भविष्यात अमेरिकेवर संकट आले, तर हे देश मदतीला येतील की नाही, याची मला शंका आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल
ट्रम्प यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीच्या लष्करी त्यागाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “ट्रम्प यांचे विधान हे अफगाणिस्तानात बलिदान देणाऱ्या आमच्या सैनिकांचा अपमान आहे. इटलीने तिथे ५३ वीर सैनिक गमावले आहेत आणि ७०० हून अधिक सैनिक कायमचे अपंग किंवा जखमी झाले आहेत. हे सत्य नाकारणे किंवा कमी लेखणे आम्हाला कदापि मान्य नाही.”
Meloni speaking facts without fear 🔥 Trump: NATO is nothing without America 🇺🇸 Meloni: Perfect. We will shut your bases, tear up trade deals, and cancel McDonald’s too 🇮🇹 pic.twitter.com/qjO7xhGKIa — Hinduism_and_Science (@Hinduism_sci) January 21, 2026
credit – social media and Twitter
मेलोनी यांनी ट्रम्प यांना ११ सप्टेंबर २००१ (9/11) च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर नाटोने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कलम ५’ (Article 5) सक्रिय केले होते. याचा अर्थ असा होता की, अमेरिकेवर झालेला हल्ला हा सर्व ३० देशांवर झालेला हल्ला मानला गेला. इटलीने हजारो सैनिकांना अफगाणिस्तानात अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या ‘रीजनल कमांड वेस्ट’ मध्ये तैनात केले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Penguin: अत्यंत हास्यास्पद! ‘आणि यांना ग्रीनलँड हवाय…’, व्हाईट हाऊसची ‘ती’ पोस्ट ठरली 2026 मधील सर्वात मोठे ट्रोलिंग
मेलोनी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “इटली आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप जुने आणि घट्ट आहेत, पण मैत्रीसाठी एकमेकांच्या योगदानाचा सन्मान करणे ही पहिली अट आहे. जेव्हा एखादा मित्र आपल्या रक्ताच्या बलिदानाचा अपमान करतो, तेव्हा ते नात्यासाठी घातक असते.” इटलीच्या संरक्षण मंत्र्यांनीही या प्रकरणी अमेरिकन संरक्षण विभागाला पत्र लिहून आपला निषेध नोंदवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Ans: ट्रम्प यांनी दावा केला की नाटो देशांनी अफगाणिस्तानात अमेरिकेला पुरेसे सहकार्य केले नाही आणि त्यांचे सैन्य आघाडीवर न राहता सुरक्षित मागे राहिले.
Ans: इटलीने २० वर्षांच्या मोहिमेत ५३ सैनिक गमावले असून ७०० हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत.
Ans: कलम ५ नुसार, नाटोच्या कोणत्याही एका सदस्य देशावर झालेला हल्ला हा सर्व सदस्य देशांवर झालेला हल्ला मानला जातो आणि सर्व देश मिळून त्याचा प्रतिकार करतात.






