Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Green Energy Innovation : गायीच्या शेणाचा असा वापर कधी पाहिलाय का? अमेरिकेतील कंपनीने तयार केलं थेट विमान इंधन

Green Energy Innovation : अमेरिकेतील स्टार्टअप कंपनीने गायीच्या शेणातील बायोगॅसपासून थेट विमान इंधन तयार केले आहे. असे करणारी ही पहिलीच कंपनी ठरली आहे. या तंत्रज्ञानामुळे विमान वाहतुकीतील कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल असे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 02:19 PM
Green Energy Innovation

Green Energy Innovation

Follow Us
Follow Us:
  • गायीच्या शेणाचा असा वापर कधी पाहिलाय का?
  • अमेरिकेतील कंपनीने त्यापासून तयार केले थेट विमान इंधन
  • जाणून घ्या कसे?
Green Energy Innovation : सध्या जगभरात प्रचंड महागाईचा भडका उडाला आहे. जग अनेक आघाड्यांवर युद्ध लढत असून सर्वत्र दैनंदिन जीवनातील वस्तू देखील महागल्या आहेत. त्यात इराण युद्धामुळे तर होर्मुझचा व्यापारी वाहतूकीचा समुद्री मार्ग बंद झाल्याने इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. कच्चा तेलाचा पुरवठा जागतिक स्तरावर अपुरा पडत असून पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने थेट गायीच्या शेणापासून विमानाचे इंधन तयार केले आहे. ज्याचा जगभरातील देशांच्या हवाई कंपन्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

G7 Summit : ‘अमेरिकेशिवाय इस्रायलचं अस्तित्व नाहीच’ ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा, G7 व्यासपीठावरुन थेट सुनावलं

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील कंपनीने गायींच्या शेणापासून निर्माण होणाऱ्या बायोगॅसचा वापर विमान इंधन तयार करण्यात केला आहे. सर्क्युलॅरिटी फ्युएल्स असे या कंपनीचे नाव असून ही एक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीने जगातील पहिला End-to-End प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे. यामुळे शाश्वत विमान इंधन उत्पादनाला गती मिळेल तेही कमी खर्चात.

इंटरेस्टिंग इंजिनियरिंगने दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या माडेरा परिसरात एका दुग्धव्यवसाय शेतात हा प्रकल्प राबवण्यात आला. या शेतात ५ हजाराहूंन अधिक गायी असून त्यांच्या शेणापासून तयार होणार बायोगॅसचा वापर करुन विमानासाठी इंधन तयार केले.

कसे तयार केले शेणापासून इंधन?

  • बायोगॅसमध्ये सुमारे ६५ टक्के मिथेन आणि ३५ टक्के कार्बन डायऑरक्साइड असते.
  • सुरवातील कंपनीने मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड वायूचे रिअॅक्टर तंत्रज्ञानाच्या मदतीने सिंथेसिस गॅमध्ये रुपांतर केले.
  • यानंतर या सिंथेसिस गॅसचे द्रवरुप हायड्रोकार्बनमध्ये तयार करण्यात आले.
  • यातून तयार झालेले इंधन व्यावसायिक विमांनामध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये ५० टक्क्यांपर्यंत मिळसले आणि हे इंधन तयार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्क्युलॅरिटी फ्युएल्स तयार केलेले हे इंधन ASTM D7566 या आंतरराष्ट्रीय दर्जांच्या निकषांमध्येही पात्र ठरले आहे.

इंधनाचे फायदे

सध्या जगभरात शाश्वत विमान इंधनाचे उत्पादन एकूण मागणीपेक्षाही अत्यंत कमी आहे. अशा परिस्थिती कृषी कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा पर्याय चांगला फायदेशीर ठरु शकतो.

यामुळे जागतिक तापमान वाढ रोखण्यासही मोठी मदत होईल. शिवाय यासाठी येणारा खर्चही कमी असल्याने भविष्यात हे इंधन जेट इंधनाच्या तुलनेने अधिक उपयुक्त ठरु शकते.

भविष्यातही टप्पे

या यशस्वी चाचणीनंतर सर्क्युलॅरिटी फ्युएल्सने २०२७ मध्ये पहिला व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेसह लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील कृषी क्षेत्रात याचा विस्तार करण्याची योजना कंपनीने आखली आहे. भारतातही गेल्या अनेक वर्षांपासून गायीच्या शेणाचा वापर होत आला आहे. पण त्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे थेट विमान इंधन तयार करण्याची ही पहिली यशस्वी प्रक्रिया ठरली आहे.

Melodi पुन्हा ट्रेंडमध्ये! G7 परिषदेत मोदी-मेलोनींच्या भेट; संवादाचा VIDEO व्हायरल

Web Title: Green energy innovation cow dung converted into jet fuel by us company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • science news
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.