Hamas hand over Bodies of four Israeli hostages, First phase of Gaza ceasefire complete
जेरुसेलम: सध्या गाझा युद्धबंदी सुरु असून यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात हमासने निर्धारित ओलिसांची सुटका केली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धविरामच्या कराराच्या वेळी स्पष्ट केले होते की, त्यांच्या नागरिकांची तिंवत असे वा मृत सर्वांची सुटका करण्यात यावी. याअंतर्गत आज हमास इस्त्रायलच्या चार नागरिकांचे मृतदेह परत करणार आहे. दीड वर्षाच्या संघर्षानंतर ही स्थिती प्रत्यक्षात उतरली आहे. पहिल्या टप्प्यात हमासने अनेक ओलिसांना सोडले असून आता मरण पावलेल्या इस्त्रायलींचे मृतदेह परत केले जाणार आहेत.
हमासच्या लष्करी प्रवक्त्याची प्रतिक्रिया
हमासचे लष्करी विंग अल कस्साम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू ओबैदा यांनी माहिती देताना सांगितले की, युद्धबंदीच्या अटींनुसार गुरुवारी(20 फेब्रुवारी) चार इस्त्रायली ओलिसांचे मृतदेह परत देणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, बिबास कुटुंबातील मृतदेह आणि बंदी ओडेड लिफ्शिट्झ यांचे मृतदेह परत केले जातील. त्यांनी नमूद केले की, इस्त्रायली हवाई हल्ल्यांमुळे या लोकांचा मृत्यू झाला असून हल्ल्यापूर्वी ते जिवंत होते.
चार मृतदेह परत
हमासने गाझाच्या खान युनिस भागात बिबास कुटुंबासह चार इस्त्रायली बंधकांचे आज सोपवले. नंतर इस्त्रायलने या मृतदेहांना सन्मानपूर्वक श्रद्धांजली दिली आणि त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. मात्र, इस्त्रायली सैन्याने या अंत्ययात्रेच्या कव्हरेजवर बंदी घातली आहे.
युद्धबंदीचा दुसरा टप्पा
हमास आणि इस्त्रायलच्या युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला लागले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या शनिवारी 602 पॅलेस्टिनी कैदी आणि ओलिसांची सुटका होणार आहे. यात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेले 157 कैदी तसेच गाझा पट्टीतून आलेल्या 445 ओलिसांची सुटका केली जाणार आहे.
दुसरा टप्पा लवकर पूर्ण करण्याचे आवाहन
हमासच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण युद्धविराम आणि गाझा पट्टीतून इस्त्रायली सैन्याची माघार यासह इतर अटी लवकरात लवकर पूर्ण केल्या जाणार आहेत. हमासने यासंदर्भात तत्परता दर्शवली असून इस्त्रायलनेही वेळ न घालवता या अटी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. गाझा संघर्षविरामाच्या या टप्प्यातील हालचालींनी युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.