Hamas has approved a 60-day ceasefire in Gaza on Monday
Israel Hamas war : जेरुसेलम : २०२३ ऑक्टोबर मध्ये सुरु झालेले इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War) आता संपायच्या मार्गावर आहे. मात्र गाझामध्ये अद्यापही इस्रायलच्या कारवाया सुरु आहेत. इस्रायलने गाझावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याअंतर्गत अनेक भागांमधून हमासच्या सैनिकांना हटवण्यात येत आहे. दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. हमासने सोमवारी (१८ ऑगस्ट) गाझामध्ये (Gaza) ६० दिवसांच्या युद्धबंदीला मान्यता दिली आहे.
यामुळे हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. युद्धबंदीसह हमासने ओलिसांच्या सुटकेसाठीचा इस्रायलाचा प्रस्तावही स्वीकारला आहे. हमासने हा प्रस्ताव अशा वेळी स्वीकारला आहे, जेव्हा इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी कारवाया वाढत असून इस्रायली हल्ल्यांच्या भीतीने पॅलेस्टिनी लोक गाझातून आपली घरे सोडून जात आहेत.
सौदी अरेबियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही तात्पुरती युद्धबंदी आहे. यामध्ये हमास ओलिसांची सुटका करेल आणि इस्रायली सैनिक गाझातून माघार घेतील. सध्या गाझाच्या पूर्वेकडील भागामध्ये इस्रायलचे हल्ले वाढले आहे. या हिंसाचारामुळे अनेक पॅलेस्टिनी लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी स्थलांतर सुरु केले आहे.
झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
इस्रायलच्या गाझातील सतत वाढत्या हल्ल्यांमुळे कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी युद्धबंदीच्या चर्चेसाठी प्रयत्नांना वेग वाढवला आहे. सध्या अधिकारी काहिरामध्ये हमाससोबत चर्चा करत आहेत.
इस्रायलने हमासने शस्त्रे खाली ठेवावीत आणि सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करावी, यानंतर त्यांचे सैन्य देखील गाझातील कारवाया थांबवेल असे म्हटले आहे. पण हमासने इस्रायलच्या या प्रस्तावाला सार्वजनिकपण पूर्णपणे युद्धबंदीला विरोध केला आहे आणि पॅलेस्टिनींचे स्वतंत्र राष्ट्र स्थापित होईपर्यंत युद्ध सुरुच राहिल असे म्हटले आहे.
सध्या इस्रायलने गाझातमध्ये ७५% भागावर ताबा मिळवला असून हा हमासचा आता शेवटचा होईल असे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netyanhu) यांनी म्हटले आहे. परंतु सध्या इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ओलिसांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून इस्रायली सैन्य गाझाच्या दक्षिणेकडील क्षेत्रामध्येही कारवाई करत आहे. तसेच येथील रहिवाशांना मदत पुरवण्याचे काम सुरु करण्यात येईल असेही बेजांमिन नेतन्याहूंनी म्हटले आहे.
याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर आपले मत मांडले आहे. त्यानी म्हटले आहे की, हमासला नष्ट केल्यानंतरच ओलिसांची सुटका होईल, यासाठी लवकरा लवकर प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे लवकर यश मिळेल.
किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा