
Hamas on the offensive after Trump's statement, Gaza ceasefire still in doubt
Israel Hamas War news Marathi : सध्या गाझात इस्रायल आणि हमास संघर्ष सुरुच आहे. यामुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस इस्रायलच्या गाझातील गोळीबाराच्या घटना बाढत आहे. यामुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना पायाभूत सुविधा, अन्न-पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. सध्या गाझामध्ये युद्धबंदीसाठी चर्चा सुरु आहे. मात्र, यावरुन अमेरिका इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका व्यक्तव्याने खळबळ उडाली आहे. यामुळे हमास तीव्र संतापला आहे. ट्रम्प यांच्या विधानाने युद्धबंदीसाठी आणि ओलीसांच्या सुटेकमध्ये अडथला निर्माण झाला आहे. नुकतेच ट्रम्प यांनी गाझातील संघर्षावर खळबळजनक विधान केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हमासला युद्धबंदी नको आहे, त्यांना मरणच स्वीकारायचे आहे. त्यांच्या या व्यक्तव्यावरुन मोठा गोंधळ उडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायल प्रतिनिधी मंडळाने गाझातील संघर्षावर वाटाघाटीची चर्चा पुन्हा सुरु केली होती. तीन आठवड्यांपासून दोहामध्ये ही चर्चा सुरु होती. यावेळी या चर्चेमध्ये ट्रम्प यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानावरुन अद्याप तीन आठड्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला कोणतेही यश मिळालेल नसल्याचे स्पष्ट होते.
मात्र ट्रम्प यांच्या या विधानानंतर हमासच्या अनेक नेत्यांनी तीव्र टीका केली आहे. अमेरिकेच्या भूमिकेवर हमासच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हमासचे नेते इज्ज अल-रिश्क यांनी, कतार आणि इजिप्तसारख्या प्रमुख देशांच्या मध्यस्थीचे आणि सकारात्मकतेचे कौतुक केले आहे. तर अमेरिकेवर टीका केली आहे.
हमासने म्हटले आहे की, आम्ही गाझातील लोकांसाठी युद्धथांबवण्यासाठी गंभीर प्रयत्न करत आहोत. हमासने याटीकेतून स्पष्ट केले आहे की, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने मतभेद असूनही युद्धबंदीची शक्यता आहे, मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे वाटाघाटींमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहे.
यामुळे गाझातील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. सामान्य नागरिकांना या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान युद्धविरामासाठी अमेरिका आणि इस्रायलने सादर केला आहे. यावरुन हमासने कायमस्वरुपी संघर्षाची मागणी केली आहे. तसेच इस्रायलला गाझातून माघार घेण्यास सांगितले आहे. मात्र इस्रायलने या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे इस्रायल आणि अमेरिकेच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.