Hamas releases heartbreaking video of Israeli hostage goes viral
Israel Hamas War News : गाझामध्ये गेल्या २२ महिन्यांपासून तीव्र युद्ध सुरु आहे. इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) मध्ये हे युद्ध सुरु असून गाझामध्ये प्रचंड विनाश झाला आहे. सध्या हे युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र सर्व चर्चा अयशस्वी ठरत आहे. याच वेळी पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र्य राष्ट्राची मागणी देखील जोर धरत आहे. या संदर्भात हमासने शनिवारी (०२ ऑगस्ट) एक निवेदन जारी केले आहे.
हमासने पॅलेस्टिनींचे स्वतंत्र राष्ट्र होईपर्यंत शस्त्र सोडणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे मध्य पूर्व राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी हमासला युद्धबंदीचे आवाहन केले होते, त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर म्हणून हमासने पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आहे. तोपर्यंत हे युद्ध थांबवणार नसल्याचे हमासने म्हटले आहे.
याच वेळी हमासने एक धक्कादायक व्हिडिओ (Video) देखील जारी केला आहे. यामध्ये इस्रायली बंधकाला क्रूर वागणून दिली जात आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इस्रायली बंधक एव्यातार डेव्हिड आहे. डेव्हिड अतिशय कमकुवत दिसत आहे, तसेच खोदकाम करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये डेव्हिड त्याची कबर खोदत असल्याचे सांगत आहे.
याच वेळी हा व्हिडिओ पाहून डेव्हिडच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडे डेव्हिडच्या कुटुंबाने हमासविरोधात कारवाईची मागणी केली आहे. हमासवर डेव्हिडला क्रूर वाहणूक दिल्याची आणि त्याला उपाशी ठेवल्याचा आरोप केला आहे.
‘ओलिसांची सुटका करा, नाहीतर…’, IDF च्या प्रमुखांची गाझात पुन्हा हल्ले सुरु करण्याची धमकी
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डेव्हिड हातात कुदळ घेऊन जमीन खोदताना दिसत आहे. डेव्हिड म्हणतो की, ‘मी माझी कबर खोदत आहे, मला इथेच गाडले जाईल, माझे शरीर कमकुवत होत चालले असून गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या पोटात अन्नाचा एकही दाणा गेलेला नाही. मी बऱ्याच काळापासून उपाशी आहे.’
This video has been released by Hamas.
The man seen in it is an Israeli hostage. He is being starved, tortured and forced to dig his own grave…The brutality is heartbreaking. 💔 pic.twitter.com/fSU0DmvqCZ
— Mr Sinha (@MrSinha_) August 3, 2025
ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यावेळी २५१ इस्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले. यातील ४९ लोक अजूनही हमासच्या (Hamas) कैदेत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. यातील २७ लोकांची मृत्यू झाल्याची शक्यता देखील इस्रायली सैन्याने वर्तवली आहे.
इस्रायलकडून ओलिसांच्या सुटकेची मागणी
दरम्यान या व्हिडिओ सर्वत्र खळबळ उडाली असून इस्रायलकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच इस्रायलकडून ओलिसांच्या सुटेकची मागणी केली जात आहे. नुकतेच इस्रायल डिफेन्स फोर्सचे प्रमुख जनरल इयाल झमीर यांनी हमासला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी हमासला ओलिसांची लवकरात लवकर सुटका करण्यास सांगितले आहे, अन्यथा गाझामध्ये पुन्हा एकदा लढाई सुरु होईल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र हमासने याला स्पष्ट नकार दिला आहे.
पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्पच्या पाठीत खुपसतोय खंजीर? बलुचिस्तानच्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ