Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडवणारा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. इस्रायलमध्ये दहशत माजवणाऱ्या ‘हमास’ या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (POK) मध्ये झालेल्या एका रॅलीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी उघड केले आहे.
ही माहिती ‘द न्यू इंडियन’ या संस्थेने आपल्या खास अहवालात दिली असून, पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या जिहादी संघटनांसोबत हमासच्या संधीचा औपचारिक सुरुवातीसदृश व्यवहार झाल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वीच ही बैठक पार पडली होती आणि त्या वेळी एक संयुक्त दहशतवादी अजेंडा आखण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
‘ऑपरेशन अल-अक्सा फ्लड’च्या नावाखाली झालेली गुप्त बैठक
५ फेब्रुवारी २०२५ रोजी शहीद साबीर स्टेडियम, पीओके येथे झालेल्या या रॅलीला ‘काश्मीर सॉलिडॅरिटी अँड ऑपरेशन अल-अक्सा फ्लड कॉन्फरन्स’ असे नाव देण्यात आले होते. यामध्ये हमासचे इराणस्थित प्रतिनिधी डॉ. खालेद अल-कदौमी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यांच्यासोबत अनेक पॅलेस्टिनी आणि पाकिस्तानी जिहादी गटांचे वरिष्ठ कमांडर सहभागी झाले होते. ही घटना केवळ एक रॅली नव्हती, तर भारतविरोधी कारवायांसाठी एकजूट होण्याचा कट होता, असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. या परिषदेत पहलगाम हल्ल्याचा कटही रचण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारताविरोधात विषारी वक्तव्यं आणि धमक्या
या कार्यक्रमात जैश-ए-मोहम्मदच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने जाहीर व्यासपीठावरून काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची धमकी दिली. त्याने म्हटले की, “पॅलेस्टाईन आणि काश्मीरमधील लढवय्ये आता एकत्रित लढा देतील. दिल्लीत रक्तपात होईल आणि काश्मीर भारतापासून अलग होईल.” ही वक्तव्ये हमासच्या इस्रायलविरोधी रणनीतीची नक्कल असल्याचे भारतीय गुप्तचर विश्लेषकांचे निरीक्षण आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हमासच्या पावलावर पाऊल ठेवत ‘शहरी दहशतवाद’ आणि संघटित हल्ल्यांची रणनीती अवलंबत आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानवर भीतीचे सावट! 29 जिल्ह्यांत Air siren बसवण्याचे आदेश; पहलगाम हल्ल्यानंतर सावधगिरी
वरिष्ठ दहशतवादी नेत्यांची उपस्थिती
या परिषदेला लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, आणि इतर जिहादी संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये जैशचा संस्थापक मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, तसेच असगर खान काश्मिरी, मसूद इलियास, आणि इतर अतिरेकींचा समावेश होता. या नेत्यांनी काश्मीरमध्ये नव्या स्वरूपात हिंसाचार सुरू करण्याचे संकेत या परिषदेत दिल्याचेही वृत्त आहे.
#WATCH | #HAMAS in #KASHMIR: #Pahalgam terror plotters attended a joint #Hamas-JeM-LeT rally in #Pakistan-occupied #Kashmir on Feb 5, 2025.
Held at Shaheed Sabir Stadium, the event marked Hamas’ first formal presence in PoK. Chilling threats were issued: “Blood will be spilled… pic.twitter.com/FImEufzPk2
— 🎙The Milli Chronicle (@millichronicle) May 1, 2025
credit : social media
भारताची चिंता वाढली, जागतिक सुरक्षा यंत्रणांचीही नजर
हमाससारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची POKमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. यामुळे काश्मीरमधील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. तसेच, ही घटना जागतिक पातळीवरही पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी या नवीन युतीचा गांभीर्याने अभ्यास सुरू केला आहे, आणि भविष्यातील धोके ओळखून सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पाकिस्तान भारताला घाबरतो’ 32 वर्षे जुन्या CIA अहवालाचा धक्कादायक खुलासा; पहलगामसारख्या हल्ल्याची आधीच होती शक्यता
POKमधील रॅलीत हमासची उपस्थिती
POKमधील रॅलीत हमासची उपस्थिती आणि पाकिस्तानातील दहशतवादी गटांसोबत त्यांची युती हे दहशतवादाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे नवे रूप उघड करणारे आहे. यामुळे भारतासमोर नव्या सुरक्षाविषयक आव्हानांची मालिका उभी राहिली आहे. आता फक्त सीमावर्ती भागच नव्हे, तर संपूर्ण देशात सजगतेची गरज वाढली आहे, आणि भारताने या नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी रणनीती अधिक बळकट करण्याची वेळ आली आहे.