Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सर्व ओलिसांची सुटका करावी’ ; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा हमासला इशारा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन करत हमासकडे सर्व ओलिसांच्या तात्त्काळ सुटकेची मागणी केली आहे. यासंबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2025 | 11:30 AM
'All hostages should be released'; US Secretary of State Marco Rubio warns Hamas

'All hostages should be released'; US Secretary of State Marco Rubio warns Hamas

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन करत हमासकडे सर्व ओलिसांच्या तात्त्काळ सुटकेची मागणी केली आहे. रुबियो यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “490 दिवसांच्या एली, ओर आणि ओहद अखेर इस्रायलमध्ये आपल्या घरी परतले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट सांगितले होते की हमासने सर्व बंधकांची सुटका करावी!” या संबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे.

इस्रायलने युद्धविरामाच्या कराराचा भाग म्हणून तीन बंधकांची सुटका झाल्याची पुष्टी केल्यानंतर रुबियो यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शनिवारी, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने जाहीर केले की ओहद बेन अमी, एली सराबी आणि ओर लेवी यांना रेड क्रॉसच्या ताब्यात देण्यात आले आणि नंतर त्यांना इस्रायली प्रदेशात आणण्यात आले. त्यानंतर त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅरिबियन समुद्रात 7.6 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी

After 490 harrowing days in captivity, Eli, Or, and Ohad are finally home in Israel. @POTUS was clear – Hamas MUST release ALL hostages NOW!

— Secretary Marco Rubio (@SecRubio) February 8, 2025

इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, ओलिसांची सुटका करण्यापूर्वी हमासने एक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात  बंधकांना एक प्रचारात्मक शोमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले गेले. या कार्यक्रमात एका नकाबपोश हमास सदस्याने भाषण दिले आणि तीन बंधकांना प्रमाणपत्र धरून मंचावर उभे केले. या वेळी अरबी, हिब्रू आणि इंग्रजी भाषांमध्ये “आम्ही महापुर आहोत, युद्धाचा पुढचा दिवस” असे बॅनर झळकत होते.

183 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

तसेच, या युद्धविरामाच्या करारांतर्गत इस्रायलने 183 पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याचे ठरवले आहे. यामध्ये नेगेवमधील केजियोट तुरुंग आणि वेस्ट बँकच्या ओफर तुरुंगातील कैदींचा समावेश आहे. यातील 18 कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते आणि सात जणांना निर्वासित केले जाणार आहे. 111 कैदी गाझामधील युद्धादरम्यान अटक झाले होते, तर उर्वरित 72 जण वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील आहेत.

युद्धबंदी करार आणि तीन टप्प्यांची योजना

इस्त्रायल आणि हमासमधील करार तीन टप्प्यात पुर्ण होणार असून यामध्ये आतापर्यंत 42 ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. पहिला टप्प्या 19 जानेवारी ते 7 मार्च पर्यत आहे. या काळात या काळात पूर्ण युद्धबंदी असणार आहे. तर दुसरा टप्प्यात 3 फेब्रुवारीनंतर पहिल्या टप्प्यातील सर्व अटींचे पालन केल्यास उर्वरित जिवंत बंधकांची सुटका करण्यात येणार आहे. तर शेवटच्या टप्प्यात गाझाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया होणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- libya News: लिबियामध्ये सापडले 29 प्रवाशांचे मृतदेह; नेमकं कारण काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Web Title: Hamas should released all hostages said us secretary of state marco rubio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
1

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
2

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
3

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा
4

Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.