libya News: लिबियामध्ये सापडले 29 प्रवाशांचे मृतदेह; नेमकं कारण काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
त्रिपोली: लीबियामध्ये 2011 पासून शांतता प्रस्थापित झालेली नाही. गेल्या काही वर्षांत हा देश मानवी तस्करीसाठी मोठा क्रेंद्रबिंदू बनला आहे. अलीकडेच, लीबियाच्या दक्षिण-पूर्व आणि पश्चिम भागात दोन ठिकाणी एकूण 29 स्थलांतरितांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा निदेशालय आणि लीबियाई रेड क्रिसेंटने ही माहिती दिली. मुअम्मर गद्दाफीच्या पतनानंतर लीबियात कोणतीही स्थिर सरकार व्यवस्था राहिलेली नाही, यामुळे हा देश आफ्रिकेतून युरोपमध्ये जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी मार्ग बनला आहे. मात्र, हा मार्ग अत्यंत धोकादाय असल्याचे म्हटले जाते.
29 मृतदेह बेकायदेशीर तस्करीशी संबंधित
अलवाहाट जिल्हा सुरक्षा निदेशालयाने दिलेल्या माहितीनुसार, लीबियाचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर बेनगाजीपासून सुमारे 441 किलोमीटर दूर असलेल्या जिखारा भागातील एका शेतात सामूहिक कबरीत 29 मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह बेकायदेशीर तस्करीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर निदेशालयाने सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, यामध्ये पोलिस अधिकारी आणि जालू रेड क्रिसेंटचे स्वयंसेवक मृतदेह प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवताना दिसत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनपुढे ट्रम्पचा तोरा उतरला; अमेरिकेने कर लादण्याचा आदेश केला स्थगित
1/2 #Libya 05.02.25 – Police jointly with Libyan Red Crescent recovered 29 unidentified bodies of #migrants found in mass graves on a farm in Jikharra (Al-Wahat District, Eastern Libya). #migrantcrisis #DontTakeToTheSea #seenotrettung #Frontex pic.twitter.com/KaZujKFO31
— Migrant Rescue Watch (@rgowans) February 7, 2025
एका दिवसात १० स्थलांतरितांचे मृतदेह सापडले
लीबियाच्या रेड क्रिसेंटनेर दिलेल्या माहितीनुसार, राजधानी त्रिपोलीपासून 40 किलोमीटर अतंरावर असलेल्या जाविया शहराजवळील दिला बंदरात एक नौका बुडाल्याने 10 स्थलांतरितांचा मृत्यू झाला. स्वयंसेवकांनी बंदर परिसरातून या सर्व मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये स्वयंसेवक मृतदेह प्लास्टिकच्या पांढऱ्या पिशव्यांमध्ये ठेवताना आणि त्यावर क्रमांक लिहिताना दिसत आहेत.
युरोपमध्ये जाण्यासाठी स्थलांतरितांचा प्रयत्न
आफ्रिकेतील अनेक देशांतील स्थलांतरित अवेध मार्गाने भूमध्य सागर ओलांडून युरोप गाठण्याचा प्रयत्न करतात. यासाठी लीबियामार्गे दोकादायक प्रवास केला जातो. जानेवारीच्या अखेरीस, अलवाहाट गुन्हे अन्वेषण विभागाने विविध देशांमधून आलेले 263 स्थलांतरित लीबियामध्ये तस्करीच्या उद्देशाने आणले गेले असल्याची माहिती दिली.
लीबियात सध्या स्थिर प्रशासन नसल्याने आणि सुरक्षा व्यवस्थेचा अभावामुळे तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन, जबरदस्ती मजुरी आणि जीवघेण्या प्रवासामुळे अनेक स्थलांतरित आपला जीव गमावत आहेत. ही समस्या रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हमासने आणखी 3 ओलिसांची केली सुटका; 183 पॅलेस्टिनीही लवकरच घरी परतणार