
hate speech of bangladesh maulavi against hindu
या व्हिडिओंध्ये मुस्लिम मौलवी हिंदुविरोधी द्वेषपूर्ण विधाने करत आहेत. हिंदूंना आणि गैर-मुस्लिम लोकांना मतदान करु नका असे आवाहन केले जात आहे. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षतितेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये हिंदूला मतदान करणे हराम आहे, काफिर उमेदवाराला मतदान करु नका असे बोलताना दिसत आहे. तसेच उघडपणे अल्पसंख्यांक धार्मिक स्थळांच्या तोडफोडची धमकी देताना दिसत आहे. यामध्ये इस्कॉन संघटनेचा थेट उल्लेख करण्यात आला आहे.
Islamic clerics in Bangladesh have reportedly declared that in the upcoming election, voting for any Hindu candidate or any kafir is “haram” (forbidden) in Islam. pic.twitter.com/adr3OnX3jB — Voice Of BD Hindus 🇧🇩 (@ItzBDHindus) January 15, 2026
हे व्हिडिओ अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा हिंदू समुदायाच्या सदस्यांवर अनेक हल्ले झाले आहेत. यामध्ये अनेक हिंदू नागरिकांची हत्या झाली आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाला आहे. शिवाय येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भडकाऊ विधाने अत्यंत धोकादायक मानली जात आहेत.
Translation : In Bangladesh, temples are for destruction, their idols are for destruction. No Hindu can live in Bangladesh, no ISKCON can live, Delhi’s brokers go to Delhi. pic.twitter.com/L38p6bvGZs — Voice Of BD Hindus 🇧🇩 (@ItzBDHindus) January 16, 2026
या परिस्थितीवर भारत सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हिंदूंवरील अत्याचारांविरोधात कठोर कारवाईची मागणी बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचा विरोध केला जात आहे. ब्रिटनने बांगलादेशातील परिस्थिती येत्या निवडणुकांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.