Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन दिवसाचं प्रेम आणि Scandle मध्ये अडकली बांगलादेशी ब्युटी क्वीन, राजदूतासह प्रेमप्रकरणादरम्यान पोहचली तुरुंगात

मॉडेलने सांगितले की ती सप्टेंबरमध्ये सौदी राजदूताला भेटली होती. तिने आरोप केला आहे की, त्याने तिला कुराण, महागडे दागिने आणि २०० किलो खजूर अशा भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 08, 2025 | 12:42 PM
बांगलादेशी ब्युटी क्वीन कशी फसली (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

बांगलादेशी ब्युटी क्वीन कशी फसली (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशी मॉडेलसह विश्वासघात 
  • मेघना आलमचा दावा 
  • राजदूतासह प्रेमप्रकरण बेतले जीवावर

बांगलादेशी मॉडेल मेघना आलम सध्या तिच्या आयुष्याला बदलून टाकणाऱ्या एका नात्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियाच्या माजी राजदूत ईसा युसेफ अल-दुहैलानसोबतच्या तिच्या नात्यामुळे तिला अटक झाली आणि यामुळे तिची बदनामी झाली आहे. ३० वर्षीय मेघना २०२० मध्ये मिस अर्थ बांगलादेश होती. 

विदेशी मेघना आलमने खुलासा केला की ती सप्टेंबर २०२४ मध्ये ढाका येथे झालेल्या एका कार्यक्रमात सौदी राजदूत अल-दुहैलानला भेटली. तिला आकर्षित करण्यासाठी, राजदूताने तिला कुराण, महागडे दागिने आणि २०० किलो खजूर अशा भेटवस्तू दिल्या, ज्यावर “सौदी राजाकडून भेट” असे लिहिले होते. मेघना म्हणते की हे नाते फारच अल्पकाळ टिकले आणि राजदूताने स्वतः तिला सांगितले की त्याचा घटस्फोट झाला आहे.

दोन दिवसाचे प्रेम आणि मोठी समस्या 

अल-दुहैलानने प्रथम मेघनाला आकर्षित केले आणि जेव्हा तो दूर राहू लागला तेव्हा ढाक्यामध्ये अफवांचे वादळ उठले. असे म्हटले जात होते की ती गर्भवती होती आणि तिचा गर्भपात झाला होता, जे मेघनाने साफ नाकारले आहे. ९ एप्रिल २०२५ च्या संध्याकाळी सर्वात वाईट घटना घडली, जो मेघनाच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस ठरला असे तिने सांगितले आहे. 

ती घरी पोहोचताच पोलिसांनी तिला घेरले. पोलिसांनी दावा केला की ही कारवाई तिच्या जन्म प्रमाणपत्राची चौकशी आणि ड्रग्ज वापराच्या संशयामुळे करण्यात आली आहे. मेघनाने धाडसी कृत्य करत संपूर्ण घटना फेसबुकवर लाईव्ह रेकॉर्ड केली, परंतु त्यानंतर लगेचच तिला ताब्यात घेण्यात आले. ती म्हणते की तिला दोन दिवस तिच्या कुटुंबाशी किंवा वकिलाशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आणण्यात आला.

बांगलादेश धगधगतोय! हिंदूंवर होतायंत सतत हल्ले; युनूस सरकारच्या भोंगळ कारभाराची चर्चा ब्रिटनच्या संसदेत

राजदूत गायब, मेघना अडकली

शिवाय, मेघनावर फसवणूक, खंडणी आणि परदेशी राजदूतांना अडकवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला होता. विशेष अधिकार कायद्याअंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला होता – तोच कायदा जो खटल्याशिवाय ताब्यात ठेवण्याची परवानगी देतो. पोलिसांनी आरोप केला की मेघना आणि तिचा सहकारी, व्यापारी देवन समीर हे परदेशी राजदूतांना हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीचा भाग होते. 

न्यायालयाने प्रकरण संवेदनशील ठरवत त्यांना ३० दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. बऱ्याच प्रयत्नांनंतर, २८ एप्रिल रोजी तिला जामीन मिळाला. मनोरंजक म्हणजे, मेघनाला अटक करण्यात आली त्याच दिवशी, इसा अल-दुहैलान गायब झाला होता आणि त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट करण्यात आले.

मानवी हक्कांचे उल्लंघन 

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली, विशेष अधिकार कायद्याचा वापर मानवी हक्कांचे उल्लंघन करतो असे म्हटले. दरम्यान, २७ महिला हक्क कार्यकर्त्यांनी अंतरिम पंतप्रधान मुहम्मद युनूस यांना पत्र लिहून मेघनाची सुटका आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. तपास अजूनही सुरू आहे, परंतु मेघना आलमची कहाणी दाखवते की एक छोटीशी चूक देखील कशी मोठी शिक्षा देऊ शकते.

India-Bangladesh Border: भारत बांगलादेश बॉर्डरवर तणाव; दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने

Web Title: High profile affair with saudi king envoy landed bangladesh model meghna alam in jail scandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh News
  • World news

संबंधित बातम्या

ब्रिटिनच्या PM चा मिश्किल अंदाज; विमानत बसताच भारतीयांसोबत केला हास्यविनोद, म्हणाले, “मी तुमचा पंतप्रधान
1

ब्रिटिनच्या PM चा मिश्किल अंदाज; विमानत बसताच भारतीयांसोबत केला हास्यविनोद, म्हणाले, “मी तुमचा पंतप्रधान

कॅनडाचे पंतप्रधान चाटतायेत डोनाल्ड ट्रम्पचे तळवे? केला भारत-पाक युद्धबंदीचा खोटा दावा
2

कॅनडाचे पंतप्रधान चाटतायेत डोनाल्ड ट्रम्पचे तळवे? केला भारत-पाक युद्धबंदीचा खोटा दावा

थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…
3

थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…

Earthquake News: पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले! 6.6 तीव्रतेने लोकांमध्ये घबराट
4

Earthquake News: पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले! 6.6 तीव्रतेने लोकांमध्ये घबराट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.