
Hindu Temple Collapses in South Africa
घटनेची माहिती मिळताच साऊथ आफ्रिकेच्या मदत आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची संख्या स्पष्ट झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, मंदिराच्या छतावर कॉंक्रीट ओतणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. कॉंक्रीटच ओतताच मंदिर कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंदिर कोसळल्याने एका ५४ वर्षीय भाविकाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले जात आहे. रात्री वाजेपर्यंत बचाव कार्य सुरु होते. आठ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. रात्री अंधारामुळे आणि धोक्यामुळे काम थांबवण्यात आले होते. सकाळी सूर्योदय होताच बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार आणि मंदिराचे अधिकारी अडकले आहेत. बचाव अधिकाऱ्यांना चिंताग्रस्त कुटुंबांना धैर्य ठेवण्यास सांगितले आहे.
ईथेकविनी महानगरिपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरासाठी नवीन मजल्याच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली नव्हती. संपूर्ण बांधकाम बेकायदेशीरित्या सुरु होते. यासाठी भारतातून आयात केलेल दगड आणि उत्खननन केलेले दगड गुहेसारखे दिसण्यासाठी वापरले जात होते. सध्या स्थानिक प्रशासनाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. बचाव पथकाला त्यांच्या कार्यात गती आणण्याचे आणि अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मंदिर एका टेकडीवर असून इथून एका कुरणाचे विहंगम दृश्य दिसते. गेल्या वर्षी देखील दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज शहरता बेकयादेशीर बांधकामामुळे इमारत कोसळली होती. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला होता. एका आठवड्याहून अधिक काळ बचाव कार्य सुरु होते.
Ans: दक्षिण आफ्रिकेच्या डबर्नच्या उत्तरकेड वेरुलाम शहरात एक हिंदू मंदिर कोसळले आहे.
Ans: दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या मंदिर दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले आहेत.
Ans: दक्षिण आफ्रिकेत मंदिर दुर्घटनेमागे बेकायदेशीर बांधकाम कारण आहे. मंदिरावर बेकादेशीरपण इमारत बांधण्यात आली होती, जी कोसळल्याने अपघात घडला.