Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Conflict : ‘खपवून घेणार नाही’ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा

Indian Ship attacked in Hormuz : भारतीय जहाजावर होर्मुझमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सरकारने शत्रूला हल्ल्यावरुन कडक इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 04:28 PM
Indian Ship attacked in Hormuz

Indian Ship attacked in Hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला
  • जहाज आग लागली अन्…
  • सरकारचा शत्रूला कडक इशारा
Indian Merchant Ship Attacked in Hormuz : नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहचला आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्ग होर्मुझ (Hormuz) मध्ये जहाजांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. नुकतेच एका भारतीय जहाजावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली असून भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

नेमकी काय घटना ?

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ एका भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला झाला आहे.  गुजरातच्या द्वारका येथील मालकीचे MSV हाजी अली हे जहाज सोमालियातील बेरबेरा बंदराहून शारजाहच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी जहाज ओमानच्या किनारपट्टीजवळ असताना अचानक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव होऊ लागला. १३ मेच्या पहाटे ३.३० च्या सुमारास होर्मुझ सामुद्रधुनीत  हा भीषण हल्ला केला.

या हल्ल्यानंतर काही क्षणातच जहाजाला मोठी आग लागली आणि जहाजा समुद्रात बुडाले. या जहाजावर एकूण १४ क्रू मेंबर्स होते. सुदैवाने सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहे. संकटाची चाहूल लागताच या नाविकांनी प्रसंगावधान सांगत  समुद्रात उडी मारली. त्यांनी तातडीने लाईफ जॅकेट्स घातले आणि लाईफ बोटीच्या मदतीने बाहेर पडले.  यावेळी ओमानच्या कोस्ट गार्डने देखील तत्परता दाखवत १४ भारतीय नाविकांना सुखरुप बाहेर काढले.

भारताची आक्रमक भूमिका

दरम्यान या हल्ल्यावर भारताने संताप व्यक्त केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात कडक शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी म्हटले आहे की,  व्यापारी जहाजांवर अशा प्रकारे हल्ले करणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. भारताने अशा प्रकारचे हल्ले आणि भारतीय नाविकांचे जीव धोक्यात आणण्याचे कृत्य सहन केले जाणार नाही अशी सक्त ताकीद दिली.

जागतिक परिणाम

सध्या या घटनेवर भारतीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस होर्मुझमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला धोका निर्माण होत आहे. ज्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.  मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेमुळे जागतिक स्तराव तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. परिणामी इंधन दरात वाढ होत आहे. जगावर मोठे उर्जा संकट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Our statement on the attack on an Indian-flagged ship off the coast of Oman ⬇️ 🔗 https://t.co/whly2BJ4TJ pic.twitter.com/PF0wAQ14zY — Randhir Jaiswal (@MEAIndia) May 14, 2026

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! भारतीय जहाजावर गोळीबाराने जगभरात खळबळ, एकाचा मृत्यू, ५ जखमी

Web Title: Hormuz conflict indian ship attacked in hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Randhir Jaiswal
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.