Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! भारतीय जहाजावर गोळीबाराने जगभरात खळबळ, एकाचा मृत्यू, ५ जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Everest वर Drone War? चीन-अमेरिका संघर्षात नेपाळचा मोठा यू-टर्न, जगभरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या अल-फैज-नूर-ए-सुलेमानी १’ या लाकडी व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजावर १८ कर्मचारी होते. हे जहाजा ०७ मे रोजी दुबईहून येमेनच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी मध्यरात्री (०८ मे) १ च्या सुमारास जहाज होर्मुझ सामुद्रधुनी पार करत असताना अचानक हल्ला झाला. यामुळे जहाजावर मोठा गोंधळ उडाला होता. हा हल्ला अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग’च्या अधिकाऱ्यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. सध्या बचाव कार्य सुरु करण्यात आले असून १३ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना दुबई बंदरावर सुरक्षितपणे दुबईवर पोहोचवले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीही नागरिकांची भेट घेतली आहे. या हल्ल्यात जहाजावरली इंजिन ड्रायव्हर अल्ताफ तालाब केर यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक खनिज तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे हा मार्ग युद्धाची भूमी बनला आहे. हा मार्ग बंद झाल्याने जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळ निर्माण झाला आहे. परिणामी इधन दर गगनाला भिडले आहे. जगभराच गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका भारतालाही बसला आहे.
भारतीय जहाजावर झालेल्या हल्लयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढ होण्याची शक्यता असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत भारताची ११ जहाजे सुखरुप परतील असून उर्वरित १३ जहाजांच्या सुरक्षेवरही सरकारचे बारकाईने लक्ष आहे. परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा भारतीय तेल पुरवठ्याच्या सुरक्षेचा आणि भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






