Hormuz Crisis : 'आम्ही हतबल आहोत' , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी, होर्मुझ नाकेबंदीवर तेहरानची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, इराणला होर्मुझची नाकेबंदी करण्याची इच्छा नसून ही केवळ एक लष्करी गरज आहे.
होर्मुझ नाकेबंदीमुळे भारताला होणाऱ्या त्रासावर आम्ही आनंदी नाही. एक सार्वभौम राष्ट्रावर जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश हल्ला करतात, तेव्हा अशा निर्णयांचा गरज पडते असे इराणने स्पष्ट केले.
सध्या या वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. होर्मुझचा मार्ग हा जगातील कच्चा तेलाच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. पण हा मार्ग बंद झाल्यामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढल्या असून आशियाई देशांना होणार पुरवठा धोक्यात आला आहे. याचा जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.
Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुझ जगातील कच्चा तेलाच्या वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरुन जगाच्या २० ते ३०% पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवला जातो. गॅसचाही पुरवठा याच मार्गावरुन होता. हा मार्ग बंद झाल्यास जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊन जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसेल.
Ans: होर्मुझ नाकेबंदीमुळे भारतासह जगभरातील देशांमध्ये तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळा येत आहे. यावर इराणने खेद व्यक्त करत परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी अमेरिका इस्रायलला जबाबदार धरले आहे.






