Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिलान विमानतळावर थरकाप उडवणारी घटना! विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तरुण अन् पुढे घडलं भयंकर

इटलीतील मिलान बर्गमो विमानतळावर अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका ३५ वर्षीय तरुणाचा वोलोटिया एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 08, 2025 | 08:32 PM
मिलान विमानतळावर थरकाप उडवणारी घटना! विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तरुण अन् पुढे घडलं भयंकर

मिलान विमानतळावर थरकाप उडवणारी घटना! विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तरुण अन् पुढे घडलं भयंकर

Follow Us
Close
Follow Us:

इटलीतील मिलान बर्गमो विमानतळावर अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका ३५ वर्षीय तरुणाचा वोलोटिया एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. हा तरुण कोणताही प्रवासी किंवा विमानतळाचा कर्मचारी नसून सुरक्षेचे सर्व नियम तोडून तो थेट टॅक्सीवेवर उभ्या असलेल्या विमानाच्या दिशेने धाव घेतली आणि तो थेट विमानाच्या जेट इंजिनमध्ये अडकला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

‘या’ दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानवर आहे नियंत्रण; संयुक्त राष्ट्रामध्ये पाकच्या राजदूतांचा मोठा दावा

ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.२० च्या सुमारास घडली. मृत व्यक्तीने आपली कार टर्मिनलजवळ सोडून विमानतळाच्या आगमन विभागात एक चुकीचा मार्ग वापरत प्रवेश केला. त्यानंतर त्याने एक सुरक्षित दरवाजा उघडून विमान उभारणीच्या जागेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तेथे वोलोटिया एअरलाइन्सचे Airbus A319 हे विमान पुशबॅक प्रक्रियेदरम्यान ऑस्टुरियस (स्पेन) साठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. त्या दिशेने धावत जाताना तो थेट इंजिनमध्ये अडकला.

सुरक्षारक्षकांना ही बाब लक्षात येईपर्यंत हे भयंकर अपघात घडला होता. उपस्थित काही कर्मचाऱ्यांनी त्याला धावत जाताना पाहिले होते, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. या घटनेनंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला आणि तातडीने सर्व उड्डाणे दोन तासांसाठी स्थगित करण्यात आली.

वोलोटिया एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, “विमान क्रमांक V73511 संदर्भात जमीनीवर एक दुर्दैवी अपघात झाला असून त्यात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत आणि लवकरच अधिक माहिती शेअर करू.”

विमानतळाचे व्यवस्थापक SACBO यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, “टॅक्सीवेवर तांत्रिक अडचणीमुळे एक विमान थांबवावे लागले असून त्यामुळे उड्डाणे विलंबित किंवा रद्द करण्यात येत आहेत.” काही वेळासाठी हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र दुपारी विमानतळाचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू झाले.

इटालियन पोलीस आणि विमानतळ प्रशासन यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की संबंधित व्यक्तीने मुद्दाम सुरक्षा भेद करून हा प्रकार केला असावा. ANSA या इटालियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तो सुरक्षा तपासणीपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सोडलेली कार आणि त्याच्या वस्तूंची तपासणी सुरु आहे, ज्यातून त्याची ओळख आणि उद्देश उघड होण्याची शक्यता आहे.

या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी एक व्यक्ती भरधाव वेगाने टॅक्सीवेच्या दिशेने धावताना पाहिला. काही क्षणांतच तो विमानाच्या इंजिनमध्ये अडकला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही दृश्ये पाहणाऱ्या अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या भावना व्यक्त करत भीती आणि खेद व्यक्त केला. संपूर्ण विमानतळावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही दुर्घटना केवळ विमानतळ सुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, तर मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरही चर्चेची गरज निर्माण करते. संबंधित व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणेही आता तपासाचा एक भाग ठरणार आहे.

विशेष म्हणजे ही घटना अशा काळात घडली आहे, जेव्हा जागतिक पातळीवर हवाई प्रवासातील अपघातांची मालिका सुरू आहे. याच वर्षी १२ जून रोजी भारतातील अहमदाबाद येथे एअर इंडियाची फ्लाइट AI-171 कोसळून २६० जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बर्गमो विमानतळावरील ही घटना आणखी चिंतेची बाब ठरते. या अपघातांमुळे विमानतळांवरील सुरक्षा यंत्रणांचा पुनर्विचार करणे आणि प्रवेश नियंत्रण अधिक बळकट करणे ही काळाची गरज बनली आहे.

‘हे कृत्य स्वीकारार्ह नाही’ ; लष्करी विमानांवर चीनचा लेझर अटॅकने जर्मनी संतप्त; ड्रॅगनला दिला कडक इशारा

मिलान बर्गमो विमानतळावरील ही घटना एक धक्का देणारी, विचार करायला लावणारी आणि अनेक आघाड्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. हवाई सुरक्षा, मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी – या सर्वच विषयांवर ही घटना पुन्हा नव्याने प्रकाश टाकते. तपास यंत्रणा आणि प्रशासनाकडून या प्रकरणात लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Horrible accident on italy milan bergamo airport man dies after getting stuck in plane jet engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • Accident News
  • Italy
  • Plane Accident

संबंधित बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…
1

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
2

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी
3

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी

रक्तरंजित महामार्ग! मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे ४५०० बळी
4

रक्तरंजित महामार्ग! मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे ४५०० बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.