'हे कृत्य स्वीकारार्ह नाही' ; लष्करी विमानांवर चीनचा लेझर अटॅकने जर्मनी संतप्त; ड्रॅगनला दिला कडक इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
China Laser Attack German Aircraft : बर्लिन : एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनने एक असे कृत्य केले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. चीनने लेझरने जर्मन लष्कराच्या एका विमानाला लक्ष्य केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर्मनीने यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच युरोपीय देशांमध्येही घबराट पसरलेली आहे.
परंतु हे काही नवी बाब नाही. चीन सतत आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करतो असतो. अनेकवेळी चीनने अशी कृत्य केली आहे, ज्याचा परिणाम इतर देशांना भोगावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने नुकतेच युरोपियन युनियन सागरी सुरक्षा निश्चित करण्याच्या हेतूविरोधात एक धोकादायक कृत्य केले आहे. चीनने जर्मनच्या ऑपरेशन ASPIDES अंतर्गत असलेल्या एका लष्करी विमानावर हल्ला केला आहे. लाल समुद्रात हा हल्ला करण्यात आला आहे. जर्मनीचे लष्करी विमान लाल समुद्रात युरोपियन युनियनच्या नागरी जहाजांच्याचे संरक्षण करते. या विमानावर चीनने लेझरने हल्ला केला आहे. या घटनेनंतर जर्मनीने चीनवर संताप व्यक्त केला असून एक कडक इशार देखील दिला आहे.
जर्मनीने चीनच्या लाल समुद्रातील या कृत्याला अस्वीकार्ह म्हटले आहे. तसेच हा हल्ला युद्धाचे आव्हान असल्याचेही म्हटले आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी ( 8 जुलै) चीनच्या राजदूताला बोलावून एक संदेश दिला आहे. जर्मन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, जर्मनीचे हे पाळत ठेवणारे विमान युरोपियन युनियच्या अॅस्पाइड मोहिमेचा भाग होते.याचा उद्देश येमेनमधील हुथी बंडखोरांच्या हल्ल्यापासून नागरी जहाजांची सुरक्षा करणे होता.
Germany accuses China of laser attack on EU mission aircraft in Red Sea
Germany has accused China of carrying out a laser attack on a German aircraft participating in the European Union’s Aspides mission in the Red Sea.
The German Foreign Ministry stated that threats to German… https://t.co/aPOS6Gg81h
— NEXTA (@nexta_tv) July 8, 2025
मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनी नौदलाने कोणतेही पूर्वसूचना आणि विनाकारण जर्मनीच्या लष्करी विमानावर लेझर हल्ला केला आहे. यापूर्वी देखील अशा घटना याभागात घडल्या आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मते युद्धनौकांद्वारे लेझरचा वापर करणे जर्मनीच्या नागरिकांच्या आणि साहित्याच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहे.
जर्मनीने चीनच्या या कृतीला विरोध केला आहे.तसेच खबरदारी म्हणून जर्मनीने आपली हवाई मोहीम रद्द केली आहे. तसेच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चीनच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. चीन जर्मनीच्या मोहीमेत अडथळा निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. जर्मनीने चीनची ही कृती सहन केली जाणार नाही असे म्हटले आहे. परंतु अद्याप यावर चीनने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.