Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीने हाकलले मग कोकणात एन्ट्री का? व्हायरल पोस्टमुळे उडाली नागरिकांची झोप; MPCB चे अधिकारी थेट…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने अटीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2025 | 02:24 PM
इटलीने हाकलले मग कोकणात एन्ट्री का? व्हायरल पोस्टमुळे उडाली नागरिकांची झोप; MPCB चे अधिकारी थेट...

इटलीने हाकलले मग कोकणात एन्ट्री का? व्हायरल पोस्टमुळे उडाली नागरिकांची झोप; MPCB चे अधिकारी थेट...

Follow Us
Close
Follow Us:

अहवाल आल्यानंतर बंदीचा निर्णय
सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक लोटे येथे दाखल
गंभीर पर्यावरणीय प्रदूषणामुळे इटलीत बंद पडली कंपनी

खेड: लोटे औद्योगिक वसाहतीतील (MIDC) लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने इटलीतील बंदी असलेल्या कंपनीतील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स वापरात आणले असल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या पोस्टच्या भडिमारामुळे संपूर्ण कोकणची झोप उडाली आहे. यावर उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर बंदीचा निर्णय घेऊ, असे सांगितलेले असतानाच सोमवारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) मुंबईतील मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक लोटेत दाखल होऊन चौकशी सुरू केली आहे.

इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषण प्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरे गेलेल्या मिटेनी एस. पी. ए. या रास्वपनिक कंपनीची मंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटेंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी करून लोटे येथे वापरात आणल्याचे वृत्त समाजमाध्यमावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनीही याबाबत दखल घेत वृत्त प्रसारित केल्याने स्थानिक पातळीवर त्याची अधिक चर्चा होऊ लागली आहे. याविषयीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने संशयकल्लोळ वाढत चालला आहे.

पाणी व मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम
लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएससारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास चाशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

माहिती व्हायरल; मुंबईतही वेगवान हालचाली
कंपनीने जून पासून चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांमधील बेस्ट (टाकाऊ माल) त्यांनी जाळण्यासाठी तळोजा येथे पाठवला आहे. ४ नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला भेट दिली होती. कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची
नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ती पुढे तज्ज्ञ समिती स्थापून त्यांच्याकडे पाठवला जाणार आहे. या तज्ज्ञ समितीकडून खात्रीशीर अहवाल आल्यानंतरच कंपनीबाचतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

इटलीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त
कंपनीबाबत दिवसेंदिवस व्हायरल होत असलेल्या माहितीमुळे आता ही कंपनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर आली आहे. यासंदर्भात मुंबईतही वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. अखेर सीमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयातून सहा बरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक कंपनीत पाठवण्यात आले, कंपनीतील यंउसामाडी, तंत्रज्ञान आणि पेटेंट्स याच्यासह परवाने यांची तपासणी केली जात आहे.

Web Title: Lakshmi organix used ban company maschinery and technology kokan people protest lote midc uday samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Chiplun
  • Italy
  • MIDC

संबंधित बातम्या

Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी
1

Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.