ट्रम्पच्या हमासला दिलेल्या चेतावणीदरम्यान गाझात बंधकाचा मृतदेह सापडला; हमास-इस्त्रायल संघर्षविरामाच्या तणावात वाढ
जेरुसेलम: अमेरिकेचे होणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या बंधकांच्या तात्काळ सुटकेची चेतावणी दिली होती. या चेतावणीनंतर दक्षिण गाझामधील भूमिगत सुरंगातून 53 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्यांना आणखी एक मृतदेह सापडला आहे. या गोष्टीमुळे इस्त्रायसल-हमास युद्ध चिघळण्याची शक्यता वाढत चालली आहे.
ओलिसांच्या सुटकेसाठी इस्त्रायल आणि हमास यांच्या सुद्धविरामसाठी चर्चा सुरु आहेत. दरम्यान यूसुफ अलजायदनी यांचा मृतदेह सापजल्याने इस्त्रायल संतप्त झाला आहे. या मृतदेहाच्या शोधामुळे इस्त्रायलवर ओलिसांच्या सुटकेच्या दिशेने जलदगतीने पावले उचलत आहे. इस्त्रायलने 100 पैकी काही बंधकांना मृत घोषित केले आहे, परंतु अजूनही निम्म्याहून अधिक बंधक जिवंत असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बंधक कुटूंब
अलजायदनी आणि त्यांचा मुलगा हमजा यांनी मृत्यूच्या काही वेळ आधीपर्यंत जीवनासाठी संघर्ष केला असावा, असा अंदाज आहे. अलजायदनी यांच्या कुटुंबातील तीन मुलांसह ते हमासकडून बंधक बनवलेल्या 250 जणांमध्ये समाविष्ट होते. ऑक्टोबर महिन्यातील हमासच्या हल्ल्यात1,200 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलांना, नोव्हेंबर 2023 मध्ये एका आठवड्याच्या युद्धविरामादरम्यान सुटकेसाठी परवानगी देण्यात आली होती. अलजायदनी हे 17 वर्षे किबुत्झ होलिटच्या डेअरी फार्ममध्ये काम करत होते. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून इज्रायलमधील “होस्टाज फॅमिलीज फोरम” या गटाने या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
इस्त्रायल आणि हमास युद्धविराम व बंधक सुटकेच्या करार उंबरठ्यावर
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे की, इस्त्रायल आणि हमास युद्धविराम व बंधक सुटकेच्या कराराच्या उंबरठ्यावर आहेत. ट्रम्प प्रशासनाने सत्ता हस्तांतरित होण्याच्या आधी हा करार पूर्ण होईल, अशी त्यांना आशा आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अलजायदनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना याचा शांतता प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या घटनेने इस्त्रायलवर संघर्षविराम कराराच्या दिशेने लवकर निर्णय घेण्याचा दबाव निर्माण केला आहे. बंधक सुटकेसाठी होणाऱ्या प्रत्येक कृतीवर आता जागतिक पातळीवर लक्ष लागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची चेतावणी
ओलिसांची सुटका करण्यासाठी हमासला डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा सांगितले होते. ट्रम्प यांनी कतारमधील ओलिसांच्या सुटकेबाबत इस्त्रायल आणि हमासच्या नेतृत्वात चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. यासंबंधित त्यांनी म्हटले की, “मी कोणत्याही वाटाघाटींना हानी पोहोचवू इच्छित नाही, परंतु मी शपथ घेण्यापूर्वी ओलिसांच्या सुटकेवर करार झाला नाही तर मध्य पूर्वमध्ये विध्वंस होईल. सर्व काही उद्ध्वस्त होईल. मला वेगळं काही सांगायची गरज नाही, पण इतकंच.”