How to get US Citizenship in easy way know the types in details
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे जन्मत: मिळणारे नागरिकत्वाचे नियम कडक केले. त्यांनंतर त्यांनी श्रीमंत गुंणतवणूकदारासांठी अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी नवा मार्ग खुला केला आहे. मात्र, हा मार्ग सर्वसामान्यांसाठी आधीच्या तुलनेत अधिक महाग आहे. यासाठी गोल्ड कार्ड नावाचा ग्रीन कार्ड ट्रम्प यांनी सुरु केले आहे. यासाठी अर्जदाराल तब्बल 2 दशलक्ष डॉलर्सच अमेरिकेत गुंतवावे लागतील. त्यांच्या या निर्णयाचा उद्देश केवळ श्रीमंत लोकांना देशात आकर्षित करणे आहे, मात्र सर्वसामान्यांसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पूर्वीच्या EB-5 व्हिसा प्रोग्राम अंतर्गत फक्त 1.5 मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 13 हजार कोटी रुपये गुंतवल्यास नागरिकत्व मिळत होते. मात्र, ट्रम्प यांच्या नव्या योजनेमुळे ही गुंतवणूक जवळपास तिपट्ट पटीने वाढली आहे. एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले होते की, “रशियाचे धनाढ्य नागरिक या नव्या मार्गाने अमेरिकेची नागरिकता घेऊ शकतात का? यावर ट्रम्प यांनी होका दिला होता. त्यांनी असेही म्हटले की, “मी काही श्रीमंत रशियन लोकांना ओळखतो, जे नक्कीच गुंतवणूक करतील.”
परंतु सध्या अमेरिकेचा नागरिकत्व मिळवण्याचा हा एकमेव मार्ग नाही. यासाठी आणखी काही मार्गही उपलब्ध आहेत.
बर्थराइट सिटिझनशिप
अमेरिकेच्या नागरिकत्वाचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे बर्थराइट सिटिझनशिप आहे. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म अमेरिकेत झाला असेल तर ती व्यक्ती अमेरिकेची नागरिक बनू शकते. विशेष म्हणजे, पालक अमेरिकेचे नाहीत त्यांनाही हा नियम लागू होतो. मात्र, एखादा विदेशी व्यक्ती वैद्यकीय उपचारासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी काही कालवधीकरता अमेरिकेत गेला असेल आणि त्याचा मुलाचा जन्म तिथे झाला, तर त्या मुलाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही.
नॅचरलायझेशनद्वारे नागरिकता
हा मार्ग अशा लोकांसाठी आहे, जे अमेरिकेत जन्मले नाहीतत मात्र कायमचे रहिवासी आहेत. नॅचरलायझेशन प्रक्रियेत चांगल्या चारित्र्याचा नागरिक असल्याचे अर्जदाराला सिद्ध करावे लागलेल. याशिवाय, अमेरिकेच्या संविधान आणि नागरी हक्कांचे ज्ञान असणे, इंग्रजी भाषेची प्राथमिक समज असणे आवश्यक आहे. अर्जदाराने अमेरिकेच्या मूल्यांप्रती निष्ठा दाखवावी लागते आणि काही चाचण्या दिल्यानंतर अमेरिकेचे नागरिकत्व मिळते.
वारसा हक्काने नागरिकता (Derivative Citizenship)
हा मार्ग नॅचरलायझेशनसारखा आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पालकांपैकी एक किंवा दोघेही अमेरिकेचे नागरिक असतील तर त्या व्यक्तीला 18 वयाच्या आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. यासाठी दोन अटी पूर्ण कराव्या लागतील पहिली व्यक्ती 18 वर्षाखालील असावा आणि दुसरी व्यक्ती अविवाहित असावा. यामुळे मुलांना त्यांच्या पालकांप्रमाणेच थेट नागरिकत्व मिळते आणि त्यांना नॅचरलायझेशन प्रक्रियेची गरज लागत नाही.
विवाहाच्या माध्यमातून नागरिकता (Marriage-Based Citizenship)
अमेरिकेच्या नागरिकाशी विवाह केल्यानंतरही “Jus Matrimonii” या प्रक्रियेद्वारे नागरिकत्व मिळू शकते. हा मार्ग द्वितीय महायुद्धानंतर अधिक लोकप्रिय झाला. मात्र, अर्जदाराला विवाहाची वैधता सिद्ध करावी लागते. विवाह खोटा नसल्याची प्रमाण द्यावे लागते. अमेरिकी सरकार अत्यंत कठोर तपासणी करते. योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यक्तीस नागरिकत्व दिले जाते.
अमेरिकेची नागरिकता मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत, श्रीमंत गुंतवणूकदारांसाठी ‘गोल्ड कार्ड’, जन्म, नॅचरलायझेशन, वारसा हक्क आणि विवाह. प्रत्येक मार्गासाठी ठराविक अटी पूर्ण कराव्या लागतात. ट्रम्प यांच्या नव्या योजनेमुळे श्रीमंत गुंतवणूकदारांना नागरिकत्वाचा सोपा मार्ग मिळत असला तरी, इतर मार्गांद्वारे सामान्य लोकही नागरिकत्व मिळवू शकतात.