ट्रम्प यांचा ट्रान्सजेंडरबाबत वादग्रस्त आदेश; सैनिकांना लष्करातून हटवण्याचा 'इतक्या' दिवसाचा अल्टिमेटम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: शपथ घेतल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील लिंग विविधता संपवणाऱ्या निर्णयाची घोषणा केली होती. अमेरिकन संघीय सरकार आता फक्त दोन लिंगान मान्यता देईल असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्याच्या बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. तसेच याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्कराने ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात भरती होण्यास बंदी घातली होती.
30 दिवसांत ट्रान्सजेंडर सैनिकांना हटवण्याचे आदेश
आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आणखी एक मोठा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी 30 दिवसांच्या आता ट्रान्सजेंडर सैनिकांना लष्करातून काढून टाकण्याचा आदेश जारी केला आहे. पेंटागॉनने बुधवारी (26 फेब्रवारी) याबाबत एक निवेदन जारी केले असून यात केस-दर प्रकरण आधारावर सूट न मिळाल्यास ट्रान्सजेंडर सैनिकांना सैन्यातून 30 दिवसांत काढून टाकण्यात यावे असे म्हटले आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी ट्रान्सडजेंडर सैन्याच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर लष्कराने हा निर्णय घेतला असून यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात सामील होण्यास किंवा सेवा सुरु ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लष्कराचा उद्देश
मीडिया रिपोर्टनुसार, 30 दिवसांत ट्रान्सजेंडर सैनिकांची ओळख पटवून लष्करी सेवेतून काढून टाकण्याची जबाबदारी पेटांगॉनकडे आहे. या धोरणाचा उद्देश सैन्यात एकता आणि अखंडता निर्माण करणे असल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे. संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिकन सैन्यात सुमारे 1.3 दशलक्ष कर्मचारी असून अंदाजे 15 हजार ट्रान्सजेंडर कर्मचारी सेवेत आहेत. मात्र अधिकृत आकडेवारी अद्याप जारी करण्यात आलेली नाही.
पहिल्या कार्यकाळातही ट्रम्प ट्रान्सजेंडर सैनिकांच्या विरोधात
ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातही ट्रान्सजेंडर सैनिकांवर बंदी आणण्याचे आश्वासन दिले होते. २०१६ साली तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी ही बंदी उठवली होती, परंतु ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात पुन्हा हा निर्णय लागू करण्यावर भर दिला आहे.
मियामी, फ्लोरिडा येथे रिपब्लिकन रिट्रीट दरम्यान ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर सैनिकांवर बंदी घालण्याच्या आपल्या धोरणावर ठाम राहण्याचा संकल्प केला. त्यांनी जाहीरपणे सांगितले की, “आम्ही ट्रांसजेंडर विचारधारेला सैन्यातून पूर्णतः नष्ट करू. आमच्या लढाऊ सेनेला जगातील सर्वोत्तम आणि अत्यंत घातक बनवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.”
ट्रान्स जेंडर समुदाय नाराज
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत ट्रान्सजेंडर हक्कावर अनेक मोठे राजकीय वादविवाद झाले. 2024 च्या निवडणुकी प्रचारादरम्यान रिपब्लिकन नेत्यांनी ट्रान्सजेंडर कायद्यांना रद्द करण्याची मागणी केली होती.डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ट्रान्सजेंडर समुदाय आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांचा आदेश भेदभावपूर्ण आहे आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारांवर आघात करत आहे.