पॅलेस्टिनी समर्थकांचा बर्नार्ड कॉलेजमध्ये जबरदस्तीने घुसून गोंधळ; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
न्यूयॉर्क: बुधवारी(26 फेब्रुवारी) न्यूयॉर्कच्या बर्नार्ड कॉलेजमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. काफियेह स्कार्फ आणि मास्क परिधान केलेल्या आंदोलकांनी कॉलेजमध्ये जबरदस्तीने मिलबैक हॉलमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी कॉलेजच्या डीनचे कार्यालय आहे. कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गोँधळादरम्यान एका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला, यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अध्यक्ष लॉरा रोसेनबरी यांनी घटनेचा विरोध केला
बर्नार्ड कॉलेजच्या अध्यक्ष लॉरा रोसेनबरी यांनी या घटनेचा तीव्र विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, आंदोलकांनी सुरक्षेकडे पुर्णपण दुर्लक्ष केले असून हे स्वीकारार्ह नाही. प्रशासानाने आंदोलकांना स्थानिक वेळेनुसार रात्री 9.30 पर्यंत परिसर सोडण्याचा इशारा दिला होता. तसे न झाल्यास, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले होते.
आंदोलकांच्या मागण्या
कोलंबिया स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन या विद्यार्थी संघटनने हे आंदोलन केले. त्यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी प्रशासनाने त्यांची भेट घेण्यास तयार असल्याचे सांगितले त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले होते. या गटाने काही प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये पॅलेस्टिनी समर्थनासाठी कारवाई करण्याच आलेल्या विद्यार्थ्यांची माफी, अध्यक्ष रोसेनबरी आणि डीन ग्रिनेज यांच्याशी बैठक आणि दोन विद्यार्थ्यांच्या निलंबनाचा पुनर्विचार करवा यांचा समावेश होता.
BREAKING: 50+ COLUMBIA STUDENTS FLOOD ADMIN OFFICE OF BARNARD COLLEGE DEMANDING
1. Immediate reversal of the two Barnard students’ expulsions.
2. Amnesty for all students disciplined for pro-Palestine action or thought. Drop all the charges now!
3. A public meeting with Dean… pic.twitter.com/QKSBQ6jIUg— Columbia Students for Justice in Palestine (@ColumbiaSJP) February 26, 2025
सोशल मीडियावर घोषणा बाजी
या आंलकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पॅलेस्टिनींना मुक्त करा असे संदेश पोस्ट कले होते. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला होता. बर्नार्ड कॉलेजच्या संचार उपाध्यक्ष रॉबिन लेविन यांनी म्हटले की, आंदोलकांनी परिसरात अनोळखी लोकांना प्रवेश देण्यास प्रोत्साहन दिले.
कॉलेजच्या परिसरात गोंधळ
प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांनी मास्क काढण्याच्या अटीला नकार दिला. आंदोलकांनी घोषणाबाजी करतना ढोल वाजवत आणि भिंतीवर बर्नार्ड नरसंहाराला अर्थसहाय्य करतो असे नारे लिहिले. या घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.