Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिबेटमध्ये चीन विरोधात मोठे निदर्शन; आंदोलनामागील नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

तिबेटमध्ये चीन विरोधात मोठ आंदोलन सुरु आहे. चीनच्या तिबेटवरीलरील ताब्यामुळे ठेणगी पेटलेली असून विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. 1950 च्या दशकात तिबेटवर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने कब्जा केला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2024 | 10:55 AM
तिबेटमध्ये चीन विरोधात मोठे निदर्शन; आंदोलनामागील नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

तिबेटमध्ये चीन विरोधात मोठे निदर्शन; आंदोलनामागील नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग: तिबेटमध्ये चीन विरोधात मोठ आंदोलन सुरु आहे. चीनच्या तिबेटवरीलरील ताब्यामुळे ठेणगी पेटलेली असून विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. 1950 च्या दशकात तिबेटवर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने कब्जा केला होता. त्यानंतर तिथे कडक कायदे लागू करण्यात आले. मात्र, सात दशकांच्या दडपशाहीनंतर तिबेटी लोत आता चीनच्या अन्याविरुद्ध आवाज उठवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2024 च्या सुरूवातीवला तिबेटमध्ये चीनरोधात मोठे आंदोलन झाले होते. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिबेटमध्ये अशा प्रकारचे विरोध प्रदर्शन फारच दुर्मिळ आहे, त्यामुळे या आंदोलनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आता यावर चीन सरकारची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पेंटागॉनच्या अहवालातून ‘PLA’ वर भ्रष्टाचाराचे आरोप; चीन सरकार म्हणाले, अमेरिका…

विरोधामागील कारणे

मीडिया रिपोर्टनुसार, या आंदोलनामागचे मुख्य कारण म्हणजे चीनने तिबेटच्या संवेदनशील भागात बांध तयार करण्याचा निर्णय घेतला होता. रिपोर्टनुसार, हा बांध गंगटू म्हणून ओळखला जातो. हा हायड्रो पॉवर प्रतकल्प डेगे व जियांगडा भागांमध्ये आहे.हा प्रकल्प तिबेटी लोकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेल्या प्रदेशावर परिणाम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. या बांधामुळे अनेक पवित्र मठ आणि सांस्कृतिक वारसा डुबणार असून, हजारो तिबेटी लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. यामुळे स्थानिक रहिवासी आणि बौद्ध भिक्षूंनी याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले आहे.

चीनची दडपशाही

तिबेटी लोकांच्या या निर्दशनाला रोखण्यासाठी चीनने कठोर पावले उचलली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शेकडो तिबेटी लोकांना अटक करण्यात आली असून, त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला आहे. या आंदोलनादरम्यान चीनच्या अत्याचारांचे सत्य उघड करणारे अनेक व्हिडिओ लीक झाले आहेत, यामुळे चीनच्या दडपशाहीचे वास्तव समोर आले आहे.

तिबेटी संस्कृतीवरील धोका

गंगटू प्रकल्पामुळे तिबेटी संस्कृतीला मोठा धोका आहे. हा प्रदेश तिबेटी लोकांसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, तिथे अनेक पवित्र मठ आहेत. याशिवाय, तिबेटी लोकांचे पारंपरिक जीवनमान या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे तिबेटी लोक चीनच्या या धोरणांविरोधात एकजुटीने उभे राहिले आहेत.

या आंदोलनामुळे तिबेटी लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. चीनच्या कठोर धोरणांविरुद्ध तिबेटी लोकांनी आता ठाम भूमिका घेतली आहे. चीनच्या प्रकल्पांमुळे होणारे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि सामाजिक परिणाम पाहता, या विरोधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळण्याची गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठावा; युनूस सरकारचे प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र

Web Title: Huge protest against china in tibet know the reason in detail nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.