
Ex-Miss Switzerland finalist Murder Case
PM नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींना फोन; इस्रायल-भारत भागीदारी मजबूत करण्याचा निर्धार
क्रिस्टीना जोक्सिमोविच ही सौंदर्यस्पर्धांमधून लोकप्रिय झालेली आहे. तिने मॉडेलिंग क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून आपले नाव कमावले आहे. तिच्य नवऱ्याने तिची खून केल्याचे म्हटले जात आहे. तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे स्वित्झर्लंडचे पोलिस आणि न्यायव्यवस्था देखील हादरली आहे. क्रिस्टीनाच्या हत्येला अत्यंत क्रूर गुन्हा ठरवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ फेब्रुवारीमझ्ये बिनिंगेन येथी क्रिस्टीनाच्या घरातून तिचा मृतदेह आढळला होत. तिच्या नवरा थॉसने क्रिस्टीना त्याला मृत अवस्थेत सापडल्याचा दावा केला होता. परंतु पोलिसांनी घटनेचा तपास केला त्यावेळी मतदेहाची स्थिती, घरातील परिस्थिती आणि फॉरेन्सिक तपासणीमधून अनेक धक्कादायक खुलासे होत त्यांचे ठोस पुरावे देखील सापडले.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील क्रिस्टीनाचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आल होता. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन अवशेषांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामुळे आरोपी थॉमसने दावा केलेला खोटा ठरला. बुधवारी (१० डिसेंबर) रोजी आरोपी थॉमसवर आरोपत्र दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयीन दस्तऐवजानुसार आणि फॉरेन्सिक अहवालानुार, थॉमसनेच क्रिस्टीनाचे हत्या केल्याचे पुरावे देखील आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे. या पुरव्यानंतर आरोपी थॉमसने त्यांच्या स्वसंरक्षमात तिची हत्या केली असल्याचे म्हटले आहे. परंतु हा दावा फॉरेन्सिक निकषांशी सुसंगत ठरलेला नाही. यामुळे त्याच्यावर क्रिस्टीनाच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या हत्येनंतर स्वित्झर्लंडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने अनेकांचा थरकाप उडाला आहे. क्रिस्टीनाची ओळक केवळ एक मॉडेल किंवा मिस फायनलिस्ट म्हणून नव्हती तर ती अनेक तरुणींनी मार्गदर्शन करणारी एक प्रशिक्षक होती. तिच्या हत्येमुळे तिचे कुटुंब, मैत्रीणी, आणि संपूर्ण मॉडेलिंग क्षेत्र हादरले आहे. क्रिस्टीनाला न्याय मिळावा अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.
मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष
Ans: क्रिस्टीना जोक्सिमोविची ही माजी मिस नॉर्थवेस्ट स्वित्झर्लंडची विजेती आणि २००७ ची माजी मिस फाइनलिस्ट होती. तिने मॉडेलिंग कोच म्हणूनही कार्य केले आहे.
Ans: क्रिस्टीनाचा पती थॉमसने तिची हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.