PM नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींना फोन; इस्रायल-भारत भागीदारी मजबूत करण्याचा निर्धार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘हमासला दहशतवादी घोषित करा’ ; LeT चा हवाला देत इस्रायलची भारताकडे मागणी, प्रकरण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत नेहमीच शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो याचा पुनरुच्चार केला. त्यांना गाझा शांतता योजनेच्या अंमलबाजवणीवर भर देत भारताचा पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. तसेच दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवरही चर्चा केली.
याशिवाय पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहूंनी दहशतवादावरही चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी दहशतादाविरोधी उभे राहण्याच्या आपल्या वचबद्धतेचा पुरुच्चार केला. तसेच एकमेकांना दहशतवादविरोदात साथ देण्याचेही म्हटले.
שוחחתי עם ידידי רה”מ נתניהו. סקרנו את ההתקדמות בשותפות האסטרטגית של הודו וישראל , וסיכמנו לחזק אף יותר את שיתוף הפעולה ביננו. בנוסף אישרנו מחדש את המחויבות שלנו לאפס סובלנת כלפי הטרור. הודו תומכת בכל המאמצים להשגת שלום צודק ומתמשך באזור.@netanyahu https://t.co/zFc7l8RLa4 — Narendra Modi (@narendramodi) December 10, 2025
दोन्ही नेत्यांच्या या संवादामुळे भारत आणि इस्रायलमध्ये सहकार्य वाढत असल्याचे स्पष्ट होते. भारत आणि इस्रायलमधील संबंध केवळ संरक्षण आणि सुरक्षितेतसाठी नसून परराष्ट्र धोरणे, प्रादेशिक शांततेही वाढत आहेत. मोदी आणि नेतन्याहू सतत फोनवरुन संवाद साधत असतात. यामुळे भारत आणि इस्रालयचे संबंध अधिक मजबूत होण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही देशात संरक्षण, तांत्रिक सहकार्य आणि अनेक आंतरराष्ट्रीय बाबींवर नियमितपणे संवाद साधत आहेत.
या संवादातून स्पष्ट होते की, भारत आणि इस्रायलचे संबंध औपचारिकतेच्या पलीकडे आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत होताना दिसत आहे. शिवाय दहशवादाविरोधी वचनामुळे विश्वास आणि सहकार्याला बळकटी मिळत आहे. हे पश्चिम आशियामध्ये भारताच्या प्रभावसाठी चांगले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक राजकारणात देखील भारताची भूमिका वाढते.
भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन






