मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स
नुकतेच त्यांनी दहशवादावरुन भारतावर गंभीर आरोप करत लोकांना भडकवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण दलाच्या प्रमुखाचे पद हाती येताच त्यांनी भारतविरोधी विष ओकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दहशतवाद हा पाकिस्तानचा नव्हे तर भारताचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे विधान हास्यास्पद आहे. स्वत: दहशतवादाला आश्रय देणाऱ्या व्यक्तीचे हे विधान अगदी हास्यास्पद आहे.
दोन दिवसापूर्वीचे असीम मुनीरने सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांना संबोधित करत भारताला इशारा दिला होता की, पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेला धोका पोहोचवण्याची कोणालाही परवानगी नाही. कोणत्याही देशान आक्रमण केल्यास पाकिस्तान त्याला कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल. मुनीर यांनी पाकिस्तानला शांतता प्रिय देश म्हणून वर्णन केले.
मुनीर म्हटले की, पाकिस्तान त्यांच्या शत्रूचा उघडपणे सामना करतो. मुनीरने म्हटले की, पाकिस्तान कोणतेही काम गुप्तपणे करत नाही, तर आपल्या शत्रूला थेट आव्हान देतो, सामोरे जाते. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान हा इस्लामिक विचारांवर आणि राष्ट्रीय ताकद, एकता, ज्ञान आणि कठोर परिश्रमांवर उभारलेला देश आहे.
पाकिस्तानने लष्करात मोठा फेरबदल झाला असून असीम मुनीर यांना सर्व संरक्षण दलांचे प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे भू-दल, हवाई दल आणि नौदलाचे ते सर्वोच्च कमांडर बनले आहेत. हा बदल भारतासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे. कारण यामुळे काश्मीर व नियंत्रणरेषेवरील तणाव वाढू शकतो.
याशिवाय सौदी अरेबियच्या पाकिस्तानच्या संबंधावर भाष्य करताना मुनीरने दोन्ही देशातील संरक्षण करार हा ऐतिहासिक असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले अल्लाहने पाकिस्तानला मक्का आणि मदिनाचे रक्षण करण्याचा सन्मान आणि जबाबदारी दिली आहे. हा अधिकार अल्लाहने इतर कोणत्याही मुस्लिम देशाला न देता त्यांना दिला आहे. पाकिस्तान हा शिक्षण, शिस्त आणि स्थिरतेच्या प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी म्हटले.
कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी
Ans: पाकिस्तानच्या असीम मुनीरने पाकिस्तान नाही, तर भारत दहशतवादाचा मार्गावर चालतो असा आरोप केला आहे.
Ans: पाकिस्तानच्या असीम मुनीरने इस्लामिक देशात जिहाद जाहीर करण्याचा आदेश फक्त राज्याला आहे. कोणत्या गटाला किंवा व्यक्तीला नाही असे म्हटले आहे.






