Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran Khan Health : सर्वात मोठी बातमी! माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू; जाणून घ्या कुणी केला ‘हा’ मोठा दावा

Imran Khan death rumor Wajahat S Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकचे ज्येष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांनी केला आहे. इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला असल्याचा त्यांचा दावा आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 12, 2026 | 03:35 PM
Imran Khan death rumor Wajahat S Khan

Imran Khan death rumor Wajahat S Khan

Follow Us
Follow Us:
  • तुरुंगात मृत्यूचा खळबळजनक दावा
  • सरकार व प्रशासनाचे मौन
  • आरोग्याबाबत चिंता व आंदोलने

पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात आणि जागतिक पातळीवर एक अत्यंत खळबळजनक बातमी चर्चेत आली आहे. पाकिस्तानचे (माजी पंतप्रधान आणि ‘तहरीक-ए-इन्साफ’ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांचा रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात मृत्यू झाल्याचा दावा वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार वजाहत एस. खान यांनी केला आहे. पाकिस्तानी लष्कर आणि अंतर्गत सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दाव्यानंतर केवळ पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अदियाला तुरुंगात कैद आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत ढासळली असून त्यांना डोळ्यांचा गंभीर आजार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना त्यांच्या बहिणी, कुटुंबीय, वकील अथवा पक्षाच्या नेत्यांना भेटू दिले जात नसल्याचा गंभीर आरोप पीटीआय पक्षाने केला आहे. यामुळेच पत्रकार वजाहत एस. खान यांच्या दाव्यानंतर समर्थकांमध्ये आणि जनतेमध्ये भीतीचे सावट पसरले असून, त्यांच्या मृत्यूची केवळ अफवा आहे की यात काही तथ्य आहे, यावर पाकिस्तान सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया स्पष्टपणे न आल्यामुळे गूढ अधिक वाढले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kariba Lake Tragedy: जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित सरोवरात भीषण अपघात; 160 प्रवाशांची बोट उलटून 15 ठार, 27 बेपत्ता

तुरुंगात कुटुंबीयांना भेटण्यावर बंदी आणि पीटीआयचे आरोप

पीटीआय (PTI) पक्षाने आणि इम्रान खान यांच्या बहिणींनी असा आरोप केला आहे की, न्यायालयाचे आदेश असूनही अदियाला जेल प्रशासन इम्रान खान यांची भेट घडवून आणत नाही. त्यांना एकांतवासात (Solitary Confinement) ठेवले जात असून त्यांच्या आरोग्याविषयीची नेमकी माहिती लपवली जात असल्याचे पीटीआयच्या नेत्यांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टाकडून आठवड्यातून दोनदा भेटीची परवानगी देण्यात आली असली, तरी स्थानिक प्रशासन वेगवेगळ्या कारणांचा हवाला देऊन भेटी नाकारत आहे. इम्रान खान यांच्या मृत्यूच्या दाव्यानंतर पीटीआयच्या हजारो समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या व तुरुंगाच्या बाहेर मोठी निदर्शने सुरू केली आहेत. समर्थकांनी तात्काळ इम्रान खान यांना माध्यमांसमोर आणावे किंवा त्यांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची ठोस माहिती जाहीर करावी, अशी मागणी लावून धरली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी रावळपिंडी आणि इस्लामाबाद परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

BIG: Senior Pakistani Journalist Wajahat S Khan claims that his sources who are three Senior Officers in Pakistani Army have said that they fear Former Pakistan PM Imran Khan is dead inside prison and hence Pakistan Army Chief Asim Munir is hiding him from the entire country. pic.twitter.com/IDjeqFEh1s — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 12, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : D.Y. Chandrachud: युक्रेनविरुद्ध रशियाच्या बाजूने भारताचा दिग्गज कायदेपंडित मैदानात; डी. वाय. चंद्रचूडांवर मोठी ‘ही’ जबाबदारी

पूर्वीही पसरल्या होत्या अफवा; सरकारपुढील आव्हान

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत आणि मृत्यूबाबत अशा अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही प्रशासनाने इम्रान खान यांच्या कुटुंबाची भेट रोखली असताना सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूचे खोटे दावे व्हायरल झाले होते. त्यावेळी जेल प्रशासनाने स्पष्टीकरण जारी करून इम्रान खान सुरक्षित आणि निरोगी असल्याचे सांगितले होते. मात्र, वारंवार भेटी नाकारल्या जात असल्याने आणि सरकारकडून पारदर्शकता दाखवली जात नसल्याने प्रत्येक वेळी अशा अफवांना खतपाणी मिळत आहे.

सध्याच्या परिस्थितीत इम्रान खान यांच्यावर तोषाखाना, भ्रष्टाचार आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. पीटीआयने असा इशारा दिला आहे की, जर इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाने तात्काळ अधिकृत माहिती दिली नाही किंवा कुटुंबीयांना भेटू दिले नाही, तर संपूर्ण पाकिस्तानात देशव्यापी आंदोलनाचा भडका उडेल.

Web Title: Imran khan death claim wajahat khan adiala jail pakistan pti protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Imran khan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
3

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
4

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.