Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Independence Day 2026 : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी, विविध देशांतील भारतीय दूतावासांमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आले होते. इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयानेही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 15, 2026 | 06:20 PM
Tiranga hoisted in Islamabad Great excitement at the Indian High Commission on the 80th Independence Day

Tiranga hoisted in Islamabad Great excitement at the Indian High Commission on the 80th Independence Day

Follow Us
Follow Us:
  • इस्लामाबादमध्ये फडकवला तिरंगा
  • जागतिक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
  • चीनसह जगभरात भारतीय दूतावासांमध्ये उत्साह

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (80th Independence Day of India) संपूर्ण जगभरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रध्वज फडकवला जात असतानाच, परदेशातील भारतीय दूतावास आणि उच्चायुक्तालयांमध्येही (Indian High Commissions) हा ऐतिहासिक दिवस अत्यंत स्वाभिमानाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयापासून ते चीनमधील बीजिंग दूतावासापर्यंत, सर्व ठिकाणी तिरंगा फडकावून राष्ट्रपतींच्या भाषणाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी जगभरातील आघाडीच्या नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय राजदूतांनी भारताच्या समृद्ध संस्कृतीचे, लोकशाहीचे आणि आर्थिक प्रगतीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत गंभीर आणि आदरयुक्त वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारताचे कार्यवाहक उच्चायुक्त (प्रभारी उच्चायुक्त) डॉ. सत्यंजल पांडे यांनी उच्चायुक्तालय आवारात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. या वेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले आणि उच्चायुक्तालयाचा परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. डॉ. सत्यंजल पांडे यांनी भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला उद्देशून केलेले अधिकृत भाषण तेथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचून दाखवले.

फ्रांस, इस्रायल आणि जपानच्या राजदूतांकडून खास संदेश

भारताच्या या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश समोर आले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, “भारताच्या सर्व नागरिकांना ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत आणि फ्रान्सची धोरणात्मक भागीदारी आगामी काळात अधिक मजबूत होईल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात

तसेच, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी विशेष संदेश जारी करत भारत-इस्रायल मैत्रीचा पुनरुच्चार केला. त्यांनी आपल्या X पोस्टमध्ये लिहिले, “आज आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. भारत आणि इस्रायल आकाराने वेगळे असले तरी, आपला प्राचीन वारसा, विविधता आणि राष्ट्रीय पुनरुत्थान समान आहे. आम्हाला इस्रायल आणि भारत यांच्यातील मैत्रीचा मोठा अभिमान आहे.”

दुसरीकडे, भारतातील जपानचे राजदूत ओनो केइची (Ono Keiichi) यांनी भारतीय नागरिकांची मने जिंकली. त्यांनी X वर पोस्ट करतानाच एक हिंदीतील व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी म्हटले, “नमस्ते भारत, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतातील जपानचे राजदूत म्हणून, या अद्भुत देशाची समृद्ध संस्कृती, उल्लेखनीय विविधता आणि गतिमान भावना अनुभवणे हे माझे सौभाग्य आहे.” व्हिडिओच्या शेवटी जपानी दूतावासातील संपूर्ण चमू हातात भारतीय तिरंगा घेऊन ‘स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा’ देताना दिसली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO

बीजिंगमध्ये मुसळधार पावसातही भारतीय समुदायाचा उत्साह

शेजारील देश चीनमधील बीजिंग येथील भारतीय दूतावासातही भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या भक्तिभावाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला. प्रतिकूल हवामान आणि मुसळधार पाऊस असतानाही स्थानिक भारतीय समुदाय आणि भारताचे मित्र मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहिले. चीनमधील भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी आवारात तिरंगा फडकवला आणि राष्ट्रपतींच्या भाषणातील मुख्य अंश उपस्थितांना सांगत भारताच्या जागतिक वाटचालीवर प्रकाश टाकला.

आशियापासून ते युरोप, अमेरिका आणि आफ्रिका खंडातील सर्वच भारतीय दूतावासांमधून आलेल्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर ट्रेंड निर्माण केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढत जाणारे वजन आणि जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भारतीयांचे देशाप्रती असलेले प्रेम या सोहळ्यांमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले आहे.

Web Title: Independence day 2026 celebrations islamabad beijing indian embassy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Independence Day 2026
  • Islamabad
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला
1

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?
2

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?

Emmanuel Macron: ‘आता अमेरिकेचा पाठिंबा मिळत नाही…’, रशिया-युक्रेन युद्धावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे प्रमुख विधान
3

Emmanuel Macron: ‘आता अमेरिकेचा पाठिंबा मिळत नाही…’, रशिया-युक्रेन युद्धावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे प्रमुख विधान

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन
4

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.