
MEA Takes Strong Stand on Bangladesh’s Anti-India Remarks
बांगलादेशने भारताच्या काही अंतर्गत बाबींवर काही वादग्रस्त टिप्पण्या केल्या आहेत. विशेष करुन भारताच्या ईशान्येकडील ‘सेव्हन सिस्टर्सवर’ बांगलादेशने अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. यामध्ये या भागांमध्ये फुटरतावादी घटकांना पाठिंबा देण्याचा आणि या राज्यांना वेगळा करण्याचा प्रयत्न बांगलादेशने केला आहे. भारतविरोधी विधानांची बांगलादेशची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक वेळा शेख हसीनाच्या पतनानंतर भारतावर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. तेव्हापासून बांगलादेश आणि भारतातील संबंध हे तणावपूर्ण राहिले आहेत. दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उच्चायुक्तांशी चर्चा करुन इशारा दिला आहे की, यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, बांगलादेशच्या नवनिर्मित राष्ट्रीय नागरिक पक्षाचे (NCP) हसनत यांनी केलेल्या विधानांतरच भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे. हसनत अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी भारताने बांगलादेश अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, तर ढाक्याने ईशान्येकडील राज्यांमध्ये हस्तक्षेप करावा असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतरच भारताने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने बांगलादेशी नागरिकांसाठीची व्हिसा संबंधित कामे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बांगलादेश निवडणुकांबाबतचे सर्व आरोपही फेटाळून लावले आहे. याशिवाय भारताने भारतीय मिशनच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेश उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांच्या भारत आणि बांगलादेशातील तणावाच्या घटकांवरील सविस्तर चर्चा परराष्ट्र मंत्रालयाने कील आहे.
The Bangladesh High Commissioner to India, Riaz Hamidullah, was today summoned by the Ministry of External Affairs and apprised of India’s strong concerns at the deteriorating security environment in Bangladesh. His attention was drawn, in particular, to the activities of some… https://t.co/6GOZHBOgsB pic.twitter.com/jNdxSK0Nc3 — ANI (@ANI) December 17, 2025
दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा
Ans: बांगलादेशच्या अनेक नेत्यांकडून भारतविरोधी विधाने समोर येत आहे. यामुळे यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विरोध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून निषेध व्यक्त केला आहे.
Ans: भारताच्या ईशान्येकडील 'सेव्हन सिस्टर्सवर' बांगलादेशने अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. यामध्ये या भागांमध्ये फुटरतावादी घटकांना पाठिंबा देण्याचा आणि या राज्यांना वेगळा करण्याचा प्रयत्न बांगलादेशने केला आहे.